महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

केंद्र सरकारच्या 'जेईई-नीट'च्या भूमिकेविरोधात काँग्रेसचे देशव्यापी आंदोलन...

काँग्रेस कार्यकर्त्यांकडून  जेईई-नीट परीक्षांविरोधात आंदोलन
काँग्रेस कार्यकर्त्यांकडून जेईई-नीट परीक्षांविरोधात आंदोलन

By

Published : Aug 28, 2020, 12:56 PM IST

12:44 August 28

सर्वोच्च न्यायालयामध्ये 6 राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडून पुर्नविचार याचिका दाखल

सर्वोच्च न्यायालयामध्ये 6 राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी पुर्नविचार याचिका दाखल केली आहे. 17 ऑगस्टला दिलेल्या निर्णयावर पुन्हा एकदा विचार करण्यात यावा आणि परिक्षा पुढे ढकलाव्यात, अशी मागणी याचिकेत केली आहे. यामध्ये पश्चिम बंगाल, झारखंड, राजस्थान, छत्तीसगढ, पंजाब, महाराष्ट्र या राज्यांचा समावेश आहे. 

12:43 August 28

जयपूरमध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांनी परिक्षेविरोधात आंदोलन

राजस्थानमधील जयपूरमध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांनी परिक्षेविरोधात आंदोलन केले. यावेळी काँग्रेस नेते सचिन पायलट उपस्थित होते. 

12:43 August 28

अहमदाबादमध्येही एनएसयुआयकडून जेईई-नीट परीक्षांविरोधात आंदोलन

गुजरातमधील अहमदाबादमध्येही नॅशनल स्टुडंट्स युनिअन ऑफ इंडियाने (एनएसयुआय) जेईई-नीट परीक्षांविरोधात आंदोलन केले. यावेळी पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले.  

12:42 August 28

दिल्लीमधील शास्त्री भवनासमोर काँग्रेस कार्यकर्त्यांनी परिक्षेविरोधात निषेध नोंदवला.

12:41 August 28

तामिळनाडूमध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांकडून जेईई-नीट परीक्षांविरोधात आंदोलन

12:15 August 28

केंद्र सरकारच्या 'जेईई-नीट'च्या भूमिकेविरोधात काँग्रेसचे देशव्यापी आंदोलन...

नवी दिल्ली - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर, विद्यार्थ्यांची सुरक्षितता लक्षात घेता वैद्यकीय आणि अभियांत्रिकी प्रवेश परीक्षा रद्द व्हाव्यात अशी मागणी देशभरातून केली जात आहे.  काँग्रेसकडून देशभरामध्ये जेईई-नीट परीक्षांविरोधात देशव्यापी आंदोलन करण्यात येणार आहे.  

दरम्यान, जेईई मेन परीक्षा 1  ते 6 सप्टेंबर 2020 दरम्यान होणार असून, नीट परीक्षा 13  सप्टेंबर रोजी होणार आहे. जेईईसाठी सुमारे 8.58 लाख विद्यार्थ्यांनी, तर नीटसाठी सुमारे 16 लाख विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. कोरोनासारखी महामारी पुढील काळातही सुरू राहील. मात्र यासाठी विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात घालता येणार नसल्याचे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले आहे. तर दररोज कोरोनाचे रुग्ण मोठ्या संख्येने सापडत असताना परीक्षा केंद्रात जाऊन परीक्षा देण्यास लाखो विद्यार्थ्यांना सक्ती करणे म्हणजे या विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळण्याचा अघोरी प्रकार असल्याचं काँग्रेस नेत्यांनी म्हटलं आहे. 

ABOUT THE AUTHOR

...view details