पणजी - गोव्याच्या राजकीय परिस्थितीत कोणतीही अस्थिरता निर्माण झालेली नाही. काँग्रेस मुद्दाम अस्थिरता असल्याची परिस्थिती निर्माण करत आहे. मुख्यमंत्री मनोहर पर्रिकरांची प्रकृती स्थिर असून आमच्या समोर कुठलाही नेतृत्त्व बदलीचा प्रस्ताव आलेला नाही, असे भाजप प्रदेशाध्यक्ष विनय तेंडूलकर बैठकीनंतर म्हणाले.
गोव्यात जोरदार राजकीय हालचाली सुरू झाल्या आहेत. काँग्रेसने गोव्यात सत्तास्थापनेचा दावा केल्यानंतर लगेच भाजपकडून आमदारांची बैठक बोलवण्यात होती. गोव्यात २ लोकसभा आणि ३ विधानसभेच्या जागेवर निवडणूक होणार आहे. याच निवडणूकींच्या पार्श्वभूमीवर आमदरांची बैठक बोलवण्यात आली असल्याचे गोवा भाजप कडून सांगण्यात आले आहे. या बैठकीला गोव्यातील वरिष्ठ मंत्र्यासह सर्व आमदार उपस्थित होते.