दिल्ली- महाराष्ट्रात घडणाऱ्या राजकीय घडामोडींवरून संसदेमध्ये काँग्रेसकडून आंदोलन करण्यात आले. याचे नेतृत्व काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी केले.
लोकशाहीची हत्या थांबवा, काँग्रसचे संसदेत आंदोलन - पंतप्रधान
महाराष्ट्रात घडणाऱ्या राजकिय घडामोडींवरून संसदेच्या हिवाळी अधिवेशनात संसद भवनामध्ये काँग्रेसकडून आंदोलन करण्यात आले.
यावेळी, संविधानची हत्या थांबवा, लोकशाहीची हत्या थांबवा, पंतप्रधान उत्तर द्या, अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या. राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेना यांच्या महाविकास आघाडीने महाराष्ट्रात सत्ता स्थापन करण्यासाठी हलचाली सुरू होत्या. परंतु, शनिवार ( दि. 23 नोव्हे.) सकाळी अचानक भाजपचे देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची तर राष्ट्रवादीच्या अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. त्यानंतर राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेना संयुक्त याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केली होती. त्यावर सध्या युक्तीवाद सुरू आहे.
हेही वाचा - महाराष्ट्राचा प्रश्न संसदेत उपस्थित करू - काँग्रेस नेते के. सुरेश