मोहम्मद अली जीना काँग्रेसचे आदर्श, गिरिराज सिंह यांची टीका - CONGRESS IDEALISES JINNAH
केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह यांनी विरोधकांवर हल्लाबोल केला आहे. 1947 पूर्वी ज्या प्रकारचा जीना यांचा व्यवहार होता. तसेच काँग्रेसचे वागणे आहे, असे सिंह म्हणाले.
नवी दिल्ली -केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह यांनी विरोधकांवर हल्लाबोल केला आहे. काँग्रेसने सावरकरांचा अपमान केला कारण, ते मोहम्मद अली जीना यांना आपला आदर्श मानतात. 1947 पूर्वी ज्याप्रकारचा जीना यांचा व्यवहार होता. तसेच काँग्रेसचे वागणे आहे, असे सिंह म्हणाले.
काँग्रेस पाकिस्तानची भाषा बोलत आहे. कलम 370, सर्जिकल स्ट्राईक, नागरिकत्व सुधारणा कायदा आणि तीन तलाकवर काँग्रेस आणि पाकिस्तानची भूमिका नेहमी सारखीच राहिली आहे. 1947 पूर्वी ज्याप्रकारचे वागणे मोहम्मद अली जीना यांचे होते. त्याच प्रकारे सध्या काँग्रेस वागत आहे. काँग्रेस देशविरोधी झाली आहे, अशी टीका सिंह यांनी केली.
मध्यप्रदेशमध्ये काँग्रेस सेवा दलाच्या प्रशिक्षण शिबिरात शुक्रवारी वाटण्यात आलेल्या पुस्तिकेवरून वाद पेटला आहे. सावरकर आणि गोडसे यांच्याबद्दल सेवा दलाच्या प्रशिक्षण शिबिरात वादग्रस्त साहित्य वाटण्यात आले. त्या पुस्तिकेमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर आणि नथुराम गोडसे यांचे शारीरिक संबंध असल्याचा उल्लेख केला आहे. त्यावरून भाजपकडून काँग्रेसवर जोरदार टीका करण्यात येत आहे.