महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

राजस्थानातील सत्तासंघर्षात वाढ; काँग्रेसचे 'हे' २ आमदार निलंबित - randeep surjewala on congress

माध्यमांमध्ये एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती. यामध्ये केंद्रीय मंत्री गजेंद्र सिंग शेखावत आणि भाजप नेते संजय जैन हे काँग्रेस आमदारांना सरकार पाडण्यासंदर्भात बोलत होते.

रणदीप सुरजेवाला
रणदीप सुरजेवाला

By

Published : Jul 17, 2020, 10:30 AM IST

Updated : Jul 17, 2020, 10:52 AM IST

नवी दिल्ली - राजस्थानातील सत्तासंघर्षात नवीन वळण पाहायला मिळत आहे. काँग्रेस आमदार भंवरलाल शर्मा आणि विश्वेंद्र सिंग यांना पक्षातून निलंबित करण्यात आले आहे, अशी माहिती काँग्रेस नेते रणदीप सुरजेवाला यांनी पत्रकार परिषदेत दिली.

माध्यमांमध्ये एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती. यामध्ये केंद्रीय मंत्री गजेंद्र सिंग शेखावत आणि भाजप नेते संजय जैन हे काँग्रेस आमदारांना सरकार पाडण्यासंदर्भात बोलत होते. आमदारांना पैसे देऊन फोडण्यासाठी भाजप नेते काँग्रेस नेत्यांना बोलत असल्याचे या ऑडिओ टेपमधून उघड झाले होते. यानंतर काँग्रेसने ही कारवाई केली आहे.

सचिन पायलट यांनी समोर येऊन भाजपला दिलेली आमदारांची यादी जाहीर करावी, असे आवाहनही सुरजेवाला यांनी केले आहे. पायलट यांच्याशी पक्ष वारंवार संपर्क करत आहे. त्यांनी आपले मुद्दे पक्षाच्या बैठकीत मांडावे, असेही त्यांनी सांगितले असल्याचे सुरजेवाला म्हणाले.

Last Updated : Jul 17, 2020, 10:52 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details