दिल्ली - काँग्रेसचे माजी आमदार सुरेंद्र कुमार यांनी दिल्लीमध्ये रविवारी काढलेल्या रॅलीत घोडचूक केली. तीन वेळा आमदारकी मिळविलेल्या सुरेंद्र कुमार यांनी गांधी वड्रा यांच्यानावाऐवजी 'प्रियंका चोप्रा जिंदाबाद' अशी घोषणा दिली.
काँग्रेसचे माजी आमदार सुरेंद्र कुमार यांनी चूकून 'प्रियंका चोप्रा जिंदाबाद' अशी रॅलीत घोषणा दिली. ही चूक लक्षात येताच त्यांनी माफी मागितली व चूक दुरुस्त केली. व्हिडिओमध्ये कुमार हे , 'सोनिया गांधी जिंदाबाद, काँग्रेस पार्टी जिंदाबाद, राहुल गांधी जिंदाबाद, प्रियंका चोप्रा जिंदाबाद' अशा घोषणा देताना दिसतात. शेवटी चूक दुरुस्त केल्यानंतर ते प्रियंका गांधी वड्रा जिंदाबाद म्हणायला विसरले नाहीत. काँग्रेसचे आमदारच प्रियंका गांधींचे नाव विसरल्याने कार्यक्रमातील उपस्थित हे चक्रावून गेले होते. यावेळी रॅलीत दिल्ली काँग्रेसचे अध्यक्ष सुभाष चोप्रा उपस्थित होते.