नवी दिल्ली - राज्यसभेच्या चार जागांसाठी 19 जूनला निवडणुका होणार आहेत. मात्र, त्याआधी कर्नाटकातील राजकीय वातावरण तापायला लागले आहे. काँग्रेसने मल्लीकार्जुन खर्गे यांचे नाव जाहीर केले आहे, तर विरोधी पक्षाने माजी पंतप्रधान एच. डी देवेगौडा यांचे राज्यसभेच्या जागेसाठी नाव पुढे केले आहे. भाजपला कमी जागा मिळाव्या म्हणून काँग्रेसचे जोरदार प्रयत्न सुरु आहेत.
नुकतेच जनता दल (धर्मनिरपेक्ष) पक्षाचे प्रमुख कुमारस्वामी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यासोबत व्हिडिओ कॉन्फसन्समध्ये दिसून आले. त्यामुळे कर्नाटकात भाजपला काँग्रेस आणि जनता दल मिळून टक्कर देऊ शकतात. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सोनिया गांधी यांनी देवेगौडा यांच्याची चर्चा केली असून निवडणूकीत विजय मिळवून देण्यासाठी काँग्रेसचे सहकार्य देण्याचे आश्वासन दिले आहे.