नवी दिल्ली - अभिनंदनच्या साहसावर देशाला गर्व आहे. यामुळे विंग कमांडर अभिनंदन यांना वीरताचा पुरस्कार देण्यात यावा तसेच त्यांच्या मिशीला राष्ट्रीय मिशी म्हणून ओळख मिळाला पाहिजे, अशी मागणी काँग्रेस खासदार अधीर रंजन चौधरी यांनी लोकसभेत केली आहे.
अभिनंदनच्या मिशांना 'राष्ट्रीय मिशी' घोषित करा; काँग्रेसची मागणी - अभिनंदन
विंग कमांडर अभिनंदन यांना वीरताचा पुरस्कार देण्यात यावा तसेच त्यांच्या मिशीला राष्ट्रीय मिशी म्हणून ओळख मिळाला पाहिजे, अशी मागणी काँग्रेस खासदार अधीर रंजन चौधरी यांनी केली आहे.
विंग कमांडर अभिनंदन
पुलवामा हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानवर एअर स्ट्राईक केला होता. यानंतर पुढच्याच दिवशी पाकिस्तानने पलटवाराचा अयशस्वी प्रयत्न केला होता. यामध्ये अभिनंदन यांच्या विमानाला अपघात झाला होता. पाकिस्तानच्या सैन्याने यानंतर अभिनंदन यांना पकडले होते. अभिनंदन यांना ३ दिवस जेलमध्ये ठेवण्यात आले होते. भारताने टाकलेल्या राजकीय दबावानंतर पाकिस्तानने अभिनंदन यांना सोडून दिले होते.