नवी दिल्ली -केरळमध्ये तिरुअनंतपुरम आंतरराष्ट्रीय विमानतळावर 30 किलो सोने जप्त करण्यात आले होते. याप्रकरणी सीबीआय चौकशी करण्याची मागणी काँग्रेसने केली आहे. या गुन्ह्यात सामील असल्याचा संशय असलेल्या राज्य व केंद्रीय पातळीवरील, सत्ताधारी पक्षाशी संबंधित लोकांची तपासणी करायला हवी, असे काँग्रेस प्रवक्ता रणदीप सुरजेवाला म्हणाले.
केरळमधील सोन्याच्या तस्करी प्रकरणाची सीबीआय चौकशी व्हावी; काँग्रेसची मागणी
केरळमध्ये तिरुअनंतपुरम आंतरराष्ट्रीय विमानतळावर 30 किलो सोने जप्त करण्यात आले होते. याप्रकरणी सीबीआय चौकशी करण्याची मागणी काँग्रेसने केली आहे.
राज्य व केंद्र सरकारमधील लोकांच्या माहिती किंवा सहकार्याशिवाय सोन्याची तस्करी होऊ शकत नाही. त्यामुळे या तस्करीमध्ये राज्य पातळीवरील माकपचा आणि केंद्रीय सरकारमधील लोकांचा सहभाग असल्याचा संशय आहे, म्हणून या प्रकरणाची चौकशी सीबीआयने करायला हवी, असे सुरजेवाला म्हणाले.
तिरुअंनतपूरम विमानतळावर तब्बल 30 किलोची सोने तस्करी पकडण्यात आली होती. राजनैतिक अधिकाऱ्यांच्या सामानामधून ही तस्करी करण्यात आली होती. तस्करीच्या रॅकेटमधील मुख्य संशयित स्वपना सुरेश ही राज्यातील सत्ताधारी माकपच्या डाव्या लोकशाही आघाडी सरकारची निकटवर्ती मानली जाते. कोट्यवधींच्या या सोने तस्करी रॅकेट प्रकरणातून मालामाल झालेल्यांची नावं शोधण्यात येत आहेत.