महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

झारखंड विधानसभा: ५ टप्प्यांत निवडणूक घेण्याचा निर्णय दुर्देवी - काँग्रेस - Jharkhand election declered

काँग्रेसने राज्याच्या निवडणुका एकाच टप्प्यात घेण्याची मागणी केली होती. मात्र, निवडणूक आयोगाने पाच टप्प्यांमध्ये मतदान घेण्याचे जाहीर केले आहे, हे दुर्देवी आहे - झारखंड काँग्रेस

आर. पी. एन सिंह

By

Published : Nov 1, 2019, 7:57 PM IST

रांची- काँग्रेसने राज्याच्या निवडणुका एकाच टप्प्यात घेण्याची मागणी केली होती. मात्र, निवडणूक आयोगाने पाच टप्प्यांमध्ये मतदान घेण्याचे जाहीर केले आहे, हे दुर्देवी आहे, असे झारखंड काँग्रेसचे प्रमुख आर. पी. एन सिंह यांनी म्हटले आहे. मात्र, निवडणूक जाहीर झाल्याचे त्यांनी स्वागत केले आहे.

हेही वाचा -झारखंड विधानसभेचं बिगूल वाजलं, ३० नोव्हेंबरला मतदान, तर २३ डिसेंबरला मतमोजणी

झारखंड विधानसभा निवडणुक २०२० चे वेळापत्रक जाहीर झाले आहे. ८१ विधानसभेच्या जागांसाठी ३० नोव्हेंबर रोजी मतदान होणार असून, २३ डिसेंबरला मतमोजणी होणार आहे. तसेच पाच टप्प्यांमध्ये राज्याच्या निवडणुका होणार आहेत. याबाबतची माहिती मुख्य निवडणूक आयुक्त सुनिल अरोरा यांनी आज दिली. राज्यामध्ये आचारसंहीता लागू झाल्याचेही त्यांनी जाहीर केले आहे.

हेही वाचा -काँग्रेसची दिल्लीतील बैठक संपली, सध्या वेट अँड वॉच ची भूमिका

झारखंड विधानसभेचा कार्यकाळ ५ जानेवारी २०२० ला पूर्ण होत आहे. त्याआधीच नवे सरकार स्थापन करण्यात येणार आहे. झारखंडमध्ये एकूण ८१ विधानसभेच्या जागा आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details