नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अहमदाबाद येथे निवडणुकीदरम्यान आचारसंहितेचा भंग केल्याची तक्रार काँग्रेसने आज (बुधवार) निवडणूक आयोगाकडे केली आहे. मोदींनी मतदान केल्यावर मोठी रॅली काढून भाषण दिले, हा आचरसंहितेचा भंग असल्याचा आरोप काँग्रेसचे नेते अभिषेक मनु सिंघवी यांनी केला आहे.
काँग्रेसचा पंतप्रधान मोदींवर आचारसंहितेचा भंग केल्याचा आरोप; निवडणूक आयोगाकडे केली तक्रार - ELECTION
निवडणुकीदरम्यान पंतप्रधान मोदी यांनी शाई लागलेला अंगठा तेथील उपस्थित लोकांना दाखवला. यामुळे आम्ही निवडणूक आयोगाकडे मोदी यांच्यावर ४८ ते ७२ तास जाहीर सभेवर बंदी घालावी
काँग्रेसच्या एका प्रतिनिधी मंडळाने निवडणूक आयोगाला सांगितले की, आजपर्यंत कुठल्याच पंतप्रधानांनी अशा पद्धतीचा आचारसंहितेचा भंग केला नाही. निवडणुकीदरम्यान पंतप्रधान मोदी यांनी शाई लागलेला अंगठा तेथील उपस्थित लोकांना दाखवला. यामुळे आम्ही निवडणूक आयोगाकडे मोदी यांच्यावर ४८ ते ७२ तास जाहीर सभेवर बंदी घालावी, अशी मागणी काँग्रेसच्या नेत्यांनी काल (मंगळवारी) रात्री लिखित स्वरुपात निवडणूक आयोगाकडे केली. या तक्रारीमध्ये मोदी यांनी २०१४ ची लोकसभा आणि २०१७ च्या विधानसभा निवडणुकीतही आचारसंहितेचा भंग केल्याचा आरोप केला आहे.
अभिषेक मनु सिंघवी यांनी सांगितले की, काँग्रेसच्या प्रतिनिधी मंडळाने मोदींकडून नांदेडच्या सभेत दिलेल्या वक्तव्यावर निवडणूक आयोगाकडे सादर केलेल्या व्हिडिओवर लवकरात लवकर कडक कारवाई करावी.