नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर काँग्रेस कार्यकारणीची बैठक आज दिल्लीत आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत राहुल गाधींनी काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा सादर केला. मात्र, कार्यकारिणीने तो एकमुखाने फेटाळून लावला. सध्याच्या परिस्थितीत राहुल गांधींचे नेतृत्वच काँग्रेसला उभारी देऊ शकते, असा विश्वास काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांनी कार्यकारिणीच्या बैठकीनंतर आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत व्यक्त केला.
देशातील लोकशाही धोक्यात आली असून काँग्रेस या प्रवृत्तीला नेहमी विरोध करत राहील. काँग्रेसचा पराभव हा विचारांचा पराभव नसून केवळ जागांच्या आकडेवारीचा पराभव आहे. राहुल गांधी यांनी काँग्रेस अध्यक्षपदाची धुरा यशस्वीपणी सांभाळली आहे, असे काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी सांगितले.