नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (रविवारी) ओडिशाच्या लोकसभा प्रचार दौऱ्यात काँग्रेस आणि बिजू जनता दलला लक्ष्य केले. 'काँग्रेस आणि बीजेडीने गरीब जनतेचा केवळ राजकारणासाठी वापर करून घेतला. काँग्रेस आणि बीजेडीच्या धोरणांमुळेच अनेक दशकांपासून ओडिशाची प्रगती होऊ शकली नाही. हे राज्य मागास आणि गरीब राहिले,' असे मोदी यांनी म्हटले आहे.
काँग्रेस, बिजू जनता दलाने गरिबांचा राजकारणासाठी वापर केला - नरेंद्र मोदी - congress
'आता निवडणुकाच ठरवतील, की देशाचे खरे हिरो अधिक सक्षम होतील, की पाकिस्तानची वकिली करणारे. आमच्या देशातील शेतकऱ्यांना आणि तरुणांना सन्मान मिळेल की, 'टुकडे-टुकडे' म्हणणाऱयांचा आवाज देशात घुमेल, हे येणाऱ्या निवडणुकाच ठरवतील,' असे मोदी म्हणाले.

मोदींनी सोनेपूर येथील एका प्रचार सभेला संबोधित करताना काँग्रेस आणि बीजेडीवर सडकून टीका केली. 'येथील गरिबांचा व्होट बँक म्हणून वापर करण्यात आला. नागरिक दारिद्र्यरेषेखाली राहिल्याचा फायदा माओवाद्यांनी करून घेतला आणि या भागात त्यांचे जाळे पसरविले. आता निवडणुकाच ठरवतील, की देशाचे खरे हिरो अधिक सक्षम होतील, की पाकिस्तानची वकिली करणारे. आमच्या देशातील शेतकऱ्यांना आणि तरुणांना सन्मान मिळेल की, 'टुकडे-टुकडे' म्हणणाऱयांचा आवाज देशात घुमेल, हे तर येणाऱ्या निवडणुकाच ठरवतील,' असेही मोदी म्हणाले.