नवी दिल्ली- बिहार विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या अंतरिम अध्यक्षा सोनिया गांधी यांनी विविध समित्यांच्या निर्मितीची घोषणा केली आहे. या समित्या बिहार निवडणुकीत काँग्रेसच्या प्रचार अभियानाचे व्यवस्थापन करतील.
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, निवडणूक व्यवस्थापन व समन्वय समिती, प्रसिद्धी समिती, मीडिया समन्वय समिती, सार्वजनिक बैठक आणि लॉजिस्टिक समिती, कायदा समिती आणि कार्यालय व्यवस्थापन समितीची निर्मिती करण्यात आली आहे. निवडणूक प्रचाराच्या व्यवस्थापनाची सर्व जबाबदारी काँग्रेसचे सरचिटणीस रणदीप सुरजेवाला यांना देण्यात आली असून, ते १४ सदस्यीय मतदान व्यवस्थापन व समन्वय समितीचे नेतृत्व करणार आहेत. प्रकाश मोहन हे या समितीचे संयोजक आणि शकीलुझमान अन्सारी हे या समितीचे सदस्य आहेत.
सुबोध कुमार हे प्रसिद्धी समितीचे प्रमुख असतील, पवन कुमार हे मीडिया समितीचे प्रमुख असतील, ब्रिजेश कुमार मुनन हे लॉजिस्टिक समितीचे प्रमुख असतील, अशोक राम हे कार्यालय व्यवस्थापन समितीचे प्रमुख असतील, तर वरून चोप्रा हे कायदा पथकाचे नेतृत्व करतील.