महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

'काँग्रेस, ओवेसी, तुकडे तुकडे गँग देशामध्ये गृहयुद्ध लावू इच्छिते' - Giriraj Singh hit out at rahul

केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह यांनी विरोधकांवर हल्लाबोल केला आहे. राहुल गांधी, औवेसी आणि इतर विरोधक देशामध्ये गृहयुद्ध लावू इच्छित आहेत, असे सिंह म्हणाले.

गिरिराज सिंह
गिरिराज सिंह

By

Published : Dec 26, 2019, 8:32 PM IST

नवी दिल्ली - नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात देशभरात आंदोलन सुरू असून विरोधकांकडून भाजपवर टीका होत आहे. त्यावर केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह यांनी विरोधकांवर हल्लाबोल केला आहे. राहुल गांधी, औवेसी आणि ईतर विरोधक देशामध्ये गृहयुद्ध लावू इच्छित आहेत, असे सिंह म्हणाले.

'काँग्रेस, ओवेसी, तुकडे तुकडे गँग देशामध्ये गृहयुद्ध लावू इच्छित'
जे मोगल आणि इंग्रज नाही करू शकले ते राहुल गांधी, काँग्रेस, तुकडे तुकडे गँग आणि एमआयएमचे अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवैसी करू इच्छित आहेत. ही लोक देशाचे विभाजन करून देशामध्ये गृहयुद्ध लावण्याचा प्रयत्न करत आहेत, असेही ते म्हणाले.


यापूर्वी भारताला जगाची 'रेप कॅपिटल' म्हटल्यानंतर राहुल गांधींनी माफी मागण्यास नकार दिला होता. माझे नाव राहुल सावरकर नाही की, मी माझ्या भाषणासाठी माफी मागेन, माझे नाव राहुल गांधी आहे, असे ते म्हणाले होते. त्यावरून केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह यांनी राहुल गांधींवर निशाणा साधला होता. उधारीचे आडनाव घेऊन कोणी गांधी होत नाही, अशी बोचरी टीका त्यांनी केली होती.

हेही वाचा - खजिन्यासाठी पतीने केला पत्नीचा खून, म्हणाला...'मी नाही भूताने तिला मारलं'

ABOUT THE AUTHOR

...view details