महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

निवडणुकीची रणधुमाळी; प्रियंका, राहुल गांधींसह पंतप्रधान मोदी आज उडवणार प्रचाराचा धुरळा - पंतप्रधान

रविवारी लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यासाठी मतदान होणार आहे. भाजपसह काँग्रेसचे दिग्गज नेते प्रचारासाठी सज्ज झाले आहेत. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 3 प्रचारसभा घेणार आहेत.

संपादित छायाचित्र

By

Published : May 10, 2019, 12:54 PM IST

नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यासाठी रविवारी मतदान होणार आहे. त्यासाठी भाजपसह काँग्रेसचे दिग्गज नेते प्रचारासाठी सज्ज झाले आहेत. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 3 प्रचारसभा घेणार आहेत. तर भाजपाध्यक्ष अमित शाह हे 2 सभा घेणार आहेत. त्यासह प्रियंका गांधी यांच्या 4 सभांचे आयोजन करण्यात आले आहे. तर राहुल गांधी हे 2 ठिकाणी सभा घेणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी -

पंतप्रधान नरेंद्र मोदी
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज 3 प्रचारसभा घेत आहेत. हरियाणातील रोहतक, हिमाचल प्रदेशातील मंडी आणि पंजाबमधील होशियारपूर येथे पंतप्रधान मोदी यांच्या प्रचारसभा होणार आहेत. भाजपाध्यक्ष अमित शाह -
अमित शाह
भाजपाध्यक्ष अमित शाह हे आज 2 प्रचारसभा घेत आहेत. हरियाणातील हिस्सार आणि चरखी दादरी येथे त्यांच्या प्रचारसभा पार पडणार आहेत. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी -
राहुल गांधी
काँग्रेसचे पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांच्या 2 प्रचारसभा आज पार पडत आहेत. हिमाचल प्रदेशातील उणा आणि चंदीगड येथे त्यांच्या प्रचारसभांचे आयोजन करण्यात आले आहे. कांग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी-वाड्रा -
प्रियंका गांधी
काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी-वाड्रा यांच्या 4 सभांचे आयोजन करण्यात आले आहे. उत्तर प्रदेशातील सिद्धार्थनगर, बस्ती, संत कबीर नगर, भदोई येथे प्रियंका जनतेला संबोधित करणार आहेत.

गेल्या काही दिवसापासून राहुल गांधी आणि प्रियंका गांधी या पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. त्याला पंतप्रधान मोदी यांनीही चोख प्रत्युत्तर दिले आहे. त्यामुळे आजच्या सभेतही राहुल आणि प्रियंका हे पंतप्रधान मोदींवर कशा प्रकारचा हल्लाबोल करणार आणि पंतप्रधान मोदी आणि अमित शाह त्यांना कशाप्रकारे प्रत्युत्तर देणार याकडे जनतेचे लक्ष लागले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details