महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

2019 लोकसभा निवडणूक : भाजपाच्या प्रचारात चिनी कंपन्यांची भागिदारी, काँग्रेसचा आरोप - Pawan Khera

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर कॉंग्रेसने जोरदार हल्ला चढवत 2019 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपाने चिनी कंपन्यांसोबत भागिदारी केल्याचा आरोप केला आहे.

Congress spokesperson
2019 लोकसभा निवडणूक : भाजपाच्या प्रचारात चिनी कंपन्यांची भागिदारी, काँग्रेसचा आरोप

By

Published : Aug 8, 2020, 2:38 PM IST

Updated : Aug 8, 2020, 3:12 PM IST

नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर कॉंग्रेसने जोरदार हल्ला चढवत 2019 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपाने चिनी कंपन्यांसोबत भागिदारी केल्याचा आरोप केला आहे. सत्ताधारी पक्षाने निवडणूक प्रचारासाठी युसी वेब ब्राऊजर, गामा लिमिटेड आणि शेअरइट टेक्नॉलॉजीसारख्या चिनी कंपन्यांना कामावर घेण्याबाबतही कॉंग्रेसने भाजपप्रणित केंद्र सरकारवर प्रश्नचिन्ह उभे केले आहे.

पंतप्रधानांनी २०१४ च्या निवडणुकीवेळी सीमा सुरक्षेच्या मुद्द्यांवर बोलत स्वत:साठी प्रतिमा तयार केली. अनेक गर्जना केल्या. मोदींची प्रतिमा निर्माण करण्यासाठी अनेक कंपन्या कोट्यवधी रुपये खर्च करण्यास तयार झाल्या. या गुंतवणुकीला नंतर फटका बसला. मात्र फक्त मोदीजींसह त्यांच्या पक्षाला याचा मोठा फायदा झाला, असे कॉंग्रेसचे प्रवक्ते पवन खेरा यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

आज हाच माणूस भारतीय हद्दीत चीन सैन्याच्या हल्ल्याचा मुद्दा आल्यानंतर लपून बसलेला दिसतो. तो या मुद्द्यांवर शांत राहतो किंवा देशाची दिशाभूल करतो, मोंदींनी चीनला क्लीन चिटही दिली. 'कोणीही आमच्या हद्दीत प्रवेश केला नाही', असे ते म्हणाले. संरक्षण मंत्रालयाच्या संकेतस्थळावरील कागदपत्रे देखील काढून टाकण्यात आली. ही दांभिकता भाजपाच्या विचारातून समोर येते. या कागदपत्रांमध्ये चीनी हल्ल्याविषयी माहिती देण्यात आली होती,असे खेरा यांनी सांगितले.

2019 मध्ये निवडणूक प्रचारासाठी यूसी वेब ब्राऊजर, गामा गाणा लिमिटेड (चीनची टेन्सेन्ट) आणि शेअरइट टेक्नॉलॉजी यासारख्या चिनी कंपन्यांना कामावर घेण्याबाबत पत्रकार परिषदे दरम्यान खेरा यांनी भाजपाप्रणीत केंद्र सरकारवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. तसेच या कंपन्यांवर बंदी घालण्याबाबतच्या सरकारच्या दाव्यांविषयीही त्यांनी भाष्य केले. पीएलएशी या कंपन्यांचा थेट संबंध आहे, जो भारताच्या सार्वभौमत्व आणि अखंडतेसाठी धोकादायक ठरत असल्याचे खेरा म्हणाले.

Last Updated : Aug 8, 2020, 3:12 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details