काँग्रेसचा १३५ वा स्थापना दिवस दिल्लीत साजरा - Foundation Day Congress
काँग्रेस पक्षाचा आज (शनिवार) १३५ वा स्थापना दिवस आहे. त्यानिमित्ताने दिल्लीत काँग्रेस पक्षाच्या कार्यालयामध्ये तिरंगा ध्वज फडकावण्यात आला.
![काँग्रेसचा १३५ वा स्थापना दिवस दिल्लीत साजरा Congress 135th Foundation Day](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-5517737-814-5517737-1577510018561.jpg)
सोनिया गांधी ध्वज फडकावताना
नवी दिल्ली- काँग्रेस पक्षाचा आज (शनिवार) १३५ वा स्थापना दिवस आहे. त्यानिमित्ताने दिल्लीत काँग्रेस पक्षाच्या कार्यालयामध्ये तिरंगा ध्वज फडकावून स्थापना दिवस साजरा करण्यात आला. यावेळी काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी, राहुल गांधी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, मोतीलाल व्होरा, ए. के अॅन्टोनी आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते उपस्थित होते.