नवी दिल्ली - उत्तर प्रदेशातील 69 हजार प्राथमिक शिक्षकांची भरती वादात सापडली आहे. भरतीतील घोटाळ्यावरुन काँग्रेसकडून सातत्याने भाजपवर टीका करण्यात येत आहे. दरम्यान, अनामिका शुक्ला या महिलेने फसवणूक करून शिक्षिकेची नोकरी मिळविल्याचे उत्तर प्रदेश सरकारने म्हटले होते. ही महिला आता पुढे आली असून ती बेरोजगार असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे उत्तरप्रदेश सरकारने महिलेची बदनामी केल्याप्रकरणी माफी मागावी, अशी मागणी काँग्रेस नेते राजीव शुक्ला यांनी केली आहे.
या प्रकरणी न्यायालयीन चौकशी करण्याची मागणी काँग्रेसकडून होत आहे. योगी आदित्यनाथ सरकारवर टीका करताना काँग्रेसच्या सचिव प्रियंका गांधी म्हणाल्या, शिक्षक भरतीतील हा घोटाळा प्रशासनातील लोकांना हाताला धरून केला जात आहे. मात्र, त्यांनी एक वर्षांपासून हा घोटाळा लपवला आहे. आता ज्या विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी कठोर मेहनत घेतली त्यांना सरकारने उत्तर द्यावे.