नवी दिल्ली - देशामध्ये कोरोना विषाणूने दहशत परसरवली असून कोरोना बाधीत रुग्णाची संख्या 184 पेक्षा अधिक झाली आहे. कोरोना विषाणूमुळे भारतामध्ये 4 जणांचा मृत्यू झाला आहे. पंजाबमध्ये गुरुवारी एका 70 वर्षीय व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
पंजाबमधील 70 वर्षीय व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू... - first death from corona virus in punjab
कोरोना विषाणूमुळे भारतामध्ये 4 जणांचा मृत्यू झाला आहे. पंजाबमध्ये एका 70 वर्षीय व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

पंजाबमधील व्यक्ती नुकतीच इटलीमार्गे जर्मनीहून भारतामध्ये आली होती. छातीत दुखत असल्यामुळे संबधित व्यक्तीला पंजाबच्या होशियारपूरमधील बांगा येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रुग्णालयात या व्यक्तीचे निधन झाले आहे. संबधीत व्यक्तीचे नाव बलदेव सिंग (70) असे नाव आहे
दिल्ली , कर्नाटक, पंजाब महाराष्ट्र राज्यात कोरोना बाधित रुग्णाचा मृत्यू झाला आहे. पंजाबमध्ये कोरोना बाधीत रुग्णाचा मृत्यू झाल्याने गावामध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. तसेच व्यक्तीच्या गावापासून तीन किमीपर्यंतचा परिसर बंद करण्यात आला आहे.