महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

युएई, कतार, कुवेतमधून येणाऱ्या प्रवाशांना १४ दिवस अलिप्त ठेवण्याचा निर्णय - महाराष्ट्र कोरोना रुग्ण

१४ दिवसांसाठी अलिप्त राहणे प्रवाशांसाठी बंधनकारक करण्यात आले आहे. १८ तारखेपासून हा निर्णय लागू होणार असून ३१ मार्चपर्यंत राबवला जाणार आहे.

हर्ष वर्धन आरोग्यमंत्री
हर्ष वर्धन आरोग्यमंत्री

By

Published : Mar 17, 2020, 3:02 PM IST

नवी दिल्ली - जगभरामध्ये कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. ७ हजारांपेक्षा जास्त जणांचा मृत्यू झाला आहे. तर १ लाख ८० हजार जणांना लागण झाली आहे. भारतात कोरोना बाधितांचा आकडा १२९ झाला आहे. खबरदारीचा उपाय म्हणून आरोग्य मंत्रालयाने युएई, कतार, ओमान आणि कुवेतमधून येणाऱ्या प्रवाशांना १४ दिवस अलिप्त वार्डमध्ये ठेवण्यात येणार असल्याचा निर्णय घेतला आहे.

१४ दिवसांसाठी अलिप्त राहणे प्रवाशांसाठी बंधनकारक करण्यात आले आहे. १८ तारखेपासून हा निर्णय लागू होणार असून ३१ मार्चपर्यंत राबवला जाणार आहे. परदेशातून भारतात येणाऱ्या प्रवाशांची तपासणी करण्यात येत आहे. त्याबरोबरच अनावश्यक परदेश प्रवास टाळण्याचे आवाहनही केंद्र सरकारने केले आहे.

केंद्र सरकार आणि राज्य सरकारे मिळून कोरोनाचा सामना करत आहेत. विविध राज्यातील शाळा, महाविद्यालये, चित्रपटगृहे आणि इतर सार्वजनिक गर्दीची ठिकाणे बंद ठेवण्यात आली आहे. महाराष्ट्रात ३९ जण कोरोना बाधित असल्याचे स्पष्ट झाले आहे. ज्या शहरांमध्ये कोरोनाचे अधिक रुग्ण सापडेल आहेत, त्या शहरातील काही भागांत कलम १४४ लागू करण्यात आले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details