नवी दिल्ली - केंद्रीय अन्न व नागरी पुरवठा मंत्री रामविलास पासवान यांच्याविरोधात कांदा दरवाढीवरून बिहारमध्ये फसवणुकीची तक्रार दाखल केली आहे. कांदा दरवाढ नियंत्रित न केल्यामुळे ही तक्रार दाखल करण्यात आली आहे.
काद्यांने केला वांदा! केंद्रीय मंत्री रामविलास पासवानविरोधात फसवणुकीची तक्रार दाखल - rising prices of onionsComplaint registered against Ram Vilas Paswan
केंद्रीय अन्न व नागरी पुरवठा मंत्री रामविलास पासवान यांच्याविरोधात कांदा दरवाढीवरून बिहारमध्ये फसवणुकीची तक्रार दाखल केली आहे.
कांद्याच्या किमती अचानक वाढल्याने ग्राहकांच्या डोळ्यात पाणी आले आहे. राजधीनी दिल्लीसह देशातील इतर शहरांमध्ये कांद्याचा दर 100 ते 120 रुपयांपर्यंत पोहचला आहे. मुजफ्फरपूर येथील एम. राजू नय्यर यांनी ही तक्रार दाखल केली आहे. केंद्रीय अन्न व नागरी पुरवठा मंत्री रामविलास पासवान यांच्याकडून मंत्रालयाची जबाबदारी सांभाळली जात नसून कांदा दरवाढीवर नियत्रंण मिळवण्यात त्यांना अपयश आल्याचे तक्रारीमध्ये म्हटले आहे.
देशभरात कांद्याचे भाव वाढत असल्याने नागरिकांमधून नाराजी व्यक्त होत आहे. तर विरोधकांनी संसदेमध्ये सरकारवर जोरदार टीका केली. दरम्यान कांद्याच्या वाढत्या किमतीला नियंत्रणात आणण्यासाठी सरकारी कंपनी एमएमटीसीकडून कांद्याची आयात करण्यात येत आहे. हा आयातीचा कांदा जानेवारीत देशात पोहोचेल.