महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

योगगुरु रामदेव बाबा यांच्याविरोधात जुन्नर कोर्टात तक्रार दाखल - योगगुरु रामदेव बाबा

योगगुरु रामदेव बाबांच्या पतंजलीने कोरोनील नावाचे औषध बनवून या औषधापासून कोरोना बरा होतो, असा दावा पत्रकार परिषदेत केला होता. त्याविरोधात जुन्नर येथील प्रथम श्रेणी न्यायालयात फौजदारी तक्रार दाखल करण्यात आली आहे.

जुन्नर
जुन्नर

By

Published : Jul 1, 2020, 9:19 AM IST

पुणे -कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत आहे. जगभरातील शास्त्रज्ञ कोरोनावर ओषध शोधण्यासाठी संशोधन करत आहेत. यातच योगगुरु रामदेव बाबांच्या पतंजलीने कोरोनील नावाचे औषध बनवून या औषधापासून कोरोना बरा होतो, असा दावा पत्रकार परिषदेत केला होता. त्याविरोधात जुन्नर येथील प्रथम श्रेणी न्यायालयात फौजदारी तक्रार दाखल करण्यात आली आहे.

जुन्नर तालुक्यातील आळेफाटा येथील विधी अभ्यासक विद्यार्थी मदन कुर्हे यांनी ही तक्रार दाखल केली आहे. कोणतीही कायदेशीर प्रक्रिया पुर्ण न करता कोरोनावरील उपचारासाठी औषध तयार करून विक्रीस उपलब्ध करण्याची प्रक्रिया बेकायदा आणि ग्राहकांची फसवणूक असल्याचा आरोप या तक्रारीत करण्यात आला आहे

कोरोना विषाणूवरील औषध शोधून काढल्याच्या रामदेव बाबांच्या दाव्याच्या विरोधात महाराष्ट्रात दाखल झालेली ही पहिलीच तक्रार आहे. पुण्यातील कायदे अभ्यासक असीम सरोदे यांच्यामार्फत ही न्यायालयीन तक्रार दाखल करण्यात आली आहे.

दरम्यान मागील आठवड्यात पतंजलीने कोरोनिल नावाचं औषध आणलं होतं. या औषधाने कोरोना बरा होतो, असाही दावा करण्यात आला होता. मात्र सरकारकडून नोटीस येताच तो दावा मागे घेण्यात आला होता. तर आता पतंजलीच्या कोरनिल या औषधाला अखेर मोदी सरकारची मान्यता मिळाली आहे. मात्र हे औषध कोरोना बरं करणारं औषध म्हणून विकता येणार नाही. तर प्रतिकार शक्ती वाढवणारं औषध म्हणून विकता येईल. प्रतिकार शक्ती वाढवणारं औषध म्हणून कोरोनिलला मोदी सरकारने मान्यता दिली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details