महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

बराक ओबामा यांच्याविरोधात उत्तरप्रदेशमध्ये तक्रार दाखल; सुनावणी 1 डिसेंबरला - राहुल गांधी

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्याविरोधात दिवाणी न्यायालयात तक्रार दाखल करण्यात आली आहे. दिवाणी न्यायालयाचे न्यायमूर्ती विनीत यादव याप्रकरणाची सुनावणी 1 डिसेंबरला करणार आहेत. 'ए प्रॉमिस्ड लँड' या पुस्तकामध्ये राहुल गांधींबद्दल अपमानजनक टिप्पणी केल्याप्रकरणी ही तक्रार दाखल झाली आहे.

बराक ओबामा
बराक ओबामा

By

Published : Nov 19, 2020, 3:27 PM IST

प्रतापगढ - अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांचे 'ए प्रॉमिस्ड लँड' हे पुस्तक सध्या चर्चेत आहे. या पुस्तकामध्ये बराक ओबामा यांनी राहुल गांधी हे नर्व्हस आणि कमी योग्यतेचे नेते आहेत, असा उल्लेख केला. यावरून वाद उफाळला आहे. येथील दिवानी न्यायालयात बराक ओबामा यांच्याविरोधात तक्रार दाखल झाली असून ओबामा यांनी आपल्या पुस्तकामध्ये राहुल गांधींबद्दल अपमानजनक टिप्पणी केली आहे, असे दाखल केलेल्या तक्रारीत म्हटल आहे. याप्रकरणाची सुनावणी 1 डिसेंबरला होणार आहे.

ऑल इंडिया रूरल बार असोसिएशनचे राष्ट्रीय अध्यक्ष ज्ञान प्रकाश शुक्ल यांनी न्यायालयात तक्रार दाखल केली. राहुल गांधी आणि माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या नावाचा उल्लेख ओबामा यांनी आपल्या पुस्तकामध्ये केला. या पुस्तकामध्ये ओबामा यांनी राहुल गांधींवर केलेली टिप्पणी ही भारतीय प्रजासत्ताक लोकशाही व्यवस्थेसाठी आक्षेपार्ह आहे, असे शुक्ल यांनी तक्रारीत म्हटलं आहे. दिवाणी न्यायालयाचे न्यायमूर्ती विनीत यादव याप्रकरणाची सुनावणी 1 डिसेंबरला करणार आहेत. तसेच ओबामा यांच्याविरोधात खटला दाखल न केल्यास दिल्लीतील अमेरिकन दूतावासासमोर उपोषण सुरू करण्याचा इशाराही ज्ञान प्रकाश शुक्ल यांनी दिला आहे.

बराक ओबामांनी काय लिहलंय पुस्तकात ?

बराक ओबामा यांचे 'ए प्रॉमिस्ड लँड' हे 768 पानांचे पुस्तक 17 नोव्हेंबर रोजी बाजारात उपलब्ध होणार आहे. या पुस्तकामध्ये राहुल गांधी आणि डॉ. मनमोहन सिंग आणि काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांचा उल्लेख केला आहे. 'राहुल गांधी अशा विद्यार्थ्याप्रमाणे आहेत. ज्याने संपूर्ण अभ्यासक्रम पूर्ण केला असून त्यांना आपल्या शिक्षकाला प्रभावित करायचे आहे. मात्र, त्या विषयात प्रभुत्व मिळण्यासाठी त्यांच्याकडे योग्यता नाही किंवा त्यांच्यात तेवढी उत्कटता नाही', असे वर्णन त्यांनी राहुल गांधींचे केले आहे. बराक ओबामा यांनी आपल्या कार्यकाळात 2010 आणि 2015 मध्ये भारताचा दौरा केला होता.

हेही वाचा -...म्हणून बराक ओबामा यांच्या मनात भारताविषयी विशेष स्थान

ABOUT THE AUTHOR

...view details