नवी दिल्ली -छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी पंतप्रधान नरेंद्र मोदींची थेट तुलना करणारे पुस्तक भाजपने प्रकाशित केले होते. त्यावरून मोठा वाद निर्माण झाला होता. आता पुन्हा भाजप नेत्या उमा भारती यांनी मोदींना छत्रपती संबोधले आहे. त्यांनी एक टि्वट करून छत्रपती मोदी जिंदाबाद असे म्हटले आहे.
उमा भारतींनी केली मोदींची छत्रपतीशी तुलना, म्हणाल्या... ‘छत्रपती मोदी जिंदाबाद!’ - छत्रपती मोदी जिंदाबाद
भाजप नेत्या उमा भारती यांनी मोदींना छत्रपती संबोधले आहे. त्यांनी एक टि्वट करून छत्रपती मोदी जिंदाबाद असे म्हटले आहे.
'लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीवर उमा भारती यांनी सलग 3 टि्वट केले. गेल्या दीड वर्षामध्ये देशातील राज्यामध्ये विधानसभा निवडणूक झाली. त्यानंतर पुन्हा लोकसभा निवडणूक झाली. या निवडणुकींच्या निकालामधून हे स्पष्ट झाले आहे की, भारतामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींना टक्कर देणारा दुसरा नेता नाही. संपूर्ण देशाच्या जनतेने मोदींना आणि मोदींनी जनतेला आपलंसं करुन घेतलं आहे. छत्रपती मोदी जिंदाबाद!', असे त्यांनी टि्वटमध्ये म्हटले आहे.
काही दिवसांपूर्वी नरेंद्र मोदींची तुलना शिवाजी महाराजांशी करणारे ‘आज के शिवाजी नरेंद्र मोदी’ हे पुस्तक प्रकाशित करण्यात आले होते. जय भगवान गोयल नावाच्या भाजप नेत्याने हे पुस्तक लिहिले असून, त्यांनी ट्विट करून पुस्तक प्रकाशीत केल्याची माहिती दिली होती. दिल्लीच्या भाजप कार्यालयात 'धार्मिक सांस्कृतिक संमेलन' आयोजित करण्यात आले होते. त्यामध्ये हे पुस्तक प्रकाशीत करण्यात आले होते. यावरुन भाजपसह नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका झाली होती. महाराष्ट्रात संतापाची लाट उठल्यावर भाजपवाल्यांना नमते घ्यावे लागले होते. आता पुन्हा उमा भारती यांच्या टि्वटवरून वादंग निर्माण होण्याची चिन्हे आहेत.