महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी समुदाय सहभाग महत्वाचा - कोरोना विषेश लेख

डॉ. नंदा किशोर कन्नुरी, आरोग्य मानववंशशास्त्रज्ञ, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ, हैदराबाद यांनी कोरोनाच्या उद्रेकानंतर आरोग्य आपत्कालीन परिस्थितीत समुदायाच्या सहभागाचे महत्त्व पटवून दिले आहे.

Community engagement and COVID-19
कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी समुदाय सहभाग महत्वाचा

By

Published : Apr 6, 2020, 1:58 PM IST

हैदराबाद: कोविड -19 वर उपचार आणि लस शोधण्याचे जोरदार प्रयत्न संशोधकांकडून सुरू आहेत. यादरम्यान कोरोनासारख्या संसर्गजन्य रोग रोखण्यासाठी सामाजिक हस्तक्षेप झाल्यास लोकांची मानसिकता तसेच वर्तनात बदल घडू शकतो. अशावेळी सार्वजनिक आरोग्य उपाय म्हणून जनजागृती करण्यासाठी समुदायाचा सहभाग महत्त्वपूर्ण आहे.

आरोग्यासंबंधित आपत्कालीन परिस्थितीत सामुदायिक सहभाग महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. सरकार आणि आरोग्य यंत्रणांनी समुदाय, रूग्ण, त्यांचे कुटुंब आणि इतर लोकांना दुसऱ्या क्षेत्रात गुंतवून ठेवावे लागेल. इबोला आणि निपाह या दोन संसर्गजन्य आजारांच्या उद्रेकावेळी समुदायातील सहभाग प्रभावी ठरला आहे.

कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी समुदाय सहभाग महत्वाचा

आफ्रिकेतील ईशान्य डीआर कॉंगोमध्ये 2018 मध्ये इबोलाचा संसर्ग पसरला. त्याला जुलै 2019 मध्ये आंतरराष्ट्रीय आरोग्य आणीबाणी म्हणून घोषित करण्यात आला होता. तर भारतात केरळमध्ये 2018मध्ये निपाहचा प्रादुर्भाव आढळला होता.

समुदाय सहभाग म्हणजे काय?

“समुदाय सहभाग म्हणजे आरोग्याशी संबंधित समस्या सोडविण्यासाठी समुदायातील लोकांना सोबत घेऊन जनजागृती करणे",अशी व्याख्या डब्ल्यूएचओने केली आहे.

समुदायाचा सहभाग कशाप्रकारे मदत करतो?

सामाजिक एकत्रीकरण: सामाजिक एकत्रीकरण हे परस्परसंबंधित आहे. कोरोनाविरोधात निधी गोळा करण्यासाठी, सोशल मीडियावर कँपेन करण्यासाठी समुदायाचा सहभाग किती महत्वाचा आहे, हे दिसून येते.

त्यासाठी स्थानिक समुदाय नेत्यांची ओळख पटविणे आणि त्यांना पद्धतशीरपणे या कामात गुंतवणे फार आवश्यक आहे. समाजाची वर्तणूक बदलण्यासाठी आणि समाजात जनजागृती करण्यासाठी स्त्रियांना एकत्रित करणे, जास्त महत्वाचे आहे.

यासाठी समाजातील सामाजिक, आर्थिक आणि राजकीय संदर्भ अतिशय महत्त्वाचे आहेत. अशा सार्वजनिक आरोग्याच्या आपत्कालीन परिस्थितीला तोंड देण्यासाठी या लोकांना जागृत करून सोबत घेणे आवश्यक ठरते. समुदायांसोबत काम करताना त्यांची संस्कृती, ज्ञान आणि अनुभव यावर आधारित काम करणे महत्वाचे आहे

संवाद -

कोरोनासारख्या साथीच्या रोगांचा सामना करण्यासाठी त्याचा उद्रेक आणि त्यामुळे उद्भवणारे जोखीम यासंबंधित प्रभावी संवाद साधणे खूप महत्वाचे आहे. सांस्कृतिकदृष्ट्या योग्य संदेश पोहचवल्यास त्याची जोखीम कमी होऊ शकते. त्या समुदायातील प्रभावी व्यक्ती, कुटुंब आणि समुदाय इतरांनाही या धोक्याबद्दल जागृत करू शकतात.

अशावेळी सतत योग्य माहिती देत समुदायात संदेश पोहचवणे आवश्यक आहे. जेणेकरुन बदलत्या साथीच्या रोगाची परिस्थिती स्पष्टपणे दर्शविली जाईल.

प्रभावी संवादाच्या रणनीतीसाठी, समुदायाच्या सांस्कृतिक समज, निकष, मूल्ये, आर्थिक परिस्थिती, सामाजिक संरचना, इतिहास आणि मागील अनुभव याबद्दल माहिती गोळा करणे महत्वाचे आहे.मुख्य माध्यमांव्यतिरीक्त बहुतेक लोक आभासी समुदाय तयार करीत आहेत आणि यासाठी माहिती मिळवण्यासाठूी ते सोशल मीडियावर अवलंबून आहेत.सोशल मीडियाद्वारे चुकीच्या माहितीचा प्रसार देखील शक्य आहे. त्यामुळे सोशल मीडियावर आभासी संवाद साधणाऱ्यांना आपल्या मदतीसाठी आणि समुदाय संवादासाठी सोबत घेणे फार कठीण आहे.दरम्यान, अशा आपात्कालीन परिस्थितीत माहितीची पारदर्शकता समुदायापर्यंत पोहोचवणे महत्वाचे असते.निपाह विषाणुचा प्रसार झाला त्यावेळी केरळने मुख्य माध्यमे आणि सोशल मीडिया दोन्हींची मदत घेऊन मोठ्या प्रमाणातत जनजागृती केली.

समुदाय सहभागाचे फायदे -

सार्वजनिक आरोग्य सुधारण्यासाठी समुदायांचा सहभाग असणे त्यांच्यासोबत मिळून काम करणे आवश्यक आहे. कोरोनासारख्या आपत्कालीन परिस्थितीशी सामना करण्यासाठी सामुदायिक तत्परता वाढविल्यास त्याचा दीर्घकालीन परिणाम होईल. यासह इतर महत्वाचे फायदे -

  1. साथीच्या रोगांवर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकारच्या प्रयत्नांवर विश्वास निर्माण करण्याची संधी आपल्याला देते.
  2. सार्वजनिक आरोग्य कर्मचार्‍यांवर समुदायांचा विश्वास वाढण्यास मदत होते.
  3. समुदायांमध्ये चुकीच्या माहितीमुळे उद्भवारी चिंता कमी होते.
  4. शारिरीक अंतर आणि स्वच्छता यासारख्या मुख्य आणि महत्वाच्या गोष्टी समुदायात रुजण्यात मदत होते. किंबहूना या समुदायाला स्वच्छता आणि शारिरीक अंतर यांचे अधिक चांगले पालन करण्यास प्रवृत्त करते.

ABOUT THE AUTHOR

...view details