दंतेवाडा- छत्तीसगडच्या दंतेवाडा हा परिसर नक्षलग्रस्त म्हणून ओळखला जातो. याच परिसरात नक्षलविरोधी मोहिमेत सहभागी असलेल्या बस्तर येथील एका महिला कमांडोने गोंडस मुलीला जन्म दिला आहे. सुनैना पटेल असे या कमांडो महिलेचे नाव आहे. ७ महिन्यांची गर्भवती असतानाही त्यांनी नक्षलविरोधी मोहिमेत सहभाग घेतला होता. त्यावेळी त्यांच्या धाडसाचे सर्वच स्तरातून कौतूक झाले होते.
सुनैना यांनी दीड महिन्यापूर्वी एका गोंडस बाळाला जन्म दिला. त्यानंतर आता त्यांचे आणि त्यांच्या बाळाचे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. छत्तीसगडचे वरिष्ठ पोलीस अधिकारी देखील सुनैना यांचा फोटो शेअर करत त्यांना शुभेच्छा देत आहेत.
छत्तीसगड पोलीस दलात सुनैना या नक्षलविरोधी दंतेश्वरी महिला कमांडो पथकात आरक्षक पदावर सेवेत रुजू आहेत. त्यांनी दंतेवाडामधील अनेक नक्षलविरोधी कारवायामध्ये सहभाग घेतला आहे. दंतेवाडाच्या संवेदनशील जंगली भागात त्यांनी अनेक नक्षल विरोधी ऑपरेशन रावबिली आहेत. एवढेच नाही तर ७ महिन्याची गर्भवती असताना देखील त्यांनी त्यांच्या कार्याला प्राध्यान देऊन नक्षलविरोधी कारवाईच्या मोहिमेत सहभाग नोंदवला होता. त्यावेळी त्या चर्चेत आल्या होत्या.
सात महिन्यांची गर्भवती कमांडो देत होती नक्षलविरोधी लढा, गोंडस मुलीला दिला जन्म गर्भवती असल्याची वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती दिली नाही.
छत्तीसगड पोलिसांनी २०१९ मध्ये महिला पोलीस कर्मचारी आणि आत्मसपर्ण केलेल्या नक्षलवाद्यांची एक महिला डीआरजी पथकाचे गठन करण्यात आले होते. या पथकात महिला पोलीस कर्मचारी सुनैना यांचाही समावेश करण्यात आला होता. दंतेवाडा छत्तीसगडमधील असा एकमेव नक्षलवादी परिसर आहे. ज्या ठिकाणी महिला पोलीस पथक तैनात आहे. जे पथक नक्षलविरोधी मोहिमेत जंगलात शोध मोहीम राबविते. या पथकात सहभागी झाल्यानंतर एक महिन्यात सुनैना यांना दिवस गेले होते. त्यानंतर सुनैना यांनी ६ महिन्यांपर्यंत आपण गर्भवती असल्याची माहिती अधिकाऱ्यांना सांगितली नाही. मात्र ज्यावेळी अधिकाऱ्यांना याबाबत माहिती मिळाली त्यानंतर त्यांनी सुनैना यांना अशा प्रकारच्या नक्षलविरोधी मोहिमेवर पाठवणे बंद केले होते.