नवी दिल्ली -भारत-चीन सीमेवर सोमवारी रात्री दोन्ही देशांच्या सैन्यामध्ये झालेल्या झटापटीमध्ये चिनी सैन्याचे कमांडिंग ऑफिसर ठार झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. घटनास्थळी चीनचे हेलिकॉप्टर, स्ट्रेचरवरून नेण्यात येणारे सैनिक आणि अॅम्बुलन्स या सर्व गोष्टींच्या हालचालीवरून चीनची मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाल्याचे दिसून येते.
भारत-चीन झटापट : चीनचा कमांडिंग ऑफिसरही ठार
या झटापटीमध्ये सहभागी असलेल्या भारतीय जवानांनी देखील चिनी सैन्याची मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाल्याचे सांगितले. मात्र, ठार आणि जखमी झालेल्यांची नेमकी संख्या सांगता येणार नाही. तरीही ही संख्या ४० च्या वर असण्याची शक्यता आहे.

सोमवारी चीनच्या सैन्याने लाईन ऑफ अॅक्च्युअल कंट्रोल (एलएसी) च्या आपल्या बाजूला काही तात्पुरत्या निशाण्या उभ्या केल्या. त्यानंतर आपल्या सैनिकांनी त्या निशाण्या खाली उतरवल्या. सुरुवातीला चीनचे सैनिक मागे हटले, मात्र त्यानंतर ते जवळपास हजार सैनिक घेऊन परत आले. भारताचेही सुमारे हजार सैनिक तिथे होते. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर हिंसक झटपट झाली. नदीच्या किनारी भागामध्ये ही झटपट सुरू असल्यामुळे कित्येक सैनिक नदीमध्ये पडले. मात्र, चीनने कराराचे पालन केले असते तर हे टाळता आले असते, असे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अनुराग श्रीवास्तव म्हणाले.