श्रीनगर - काश्मीरात दहशतवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत लष्करातील कर्नल, मेजरसहर पाच जण हुतात्मा झाले आहेत. उत्तर काश्मीरमधील कुपवाडा जिल्ह्यातील हंदवारा येथे ही घटना घडली. यावेळी चांजामुल्ला भागात दोन दहशतवाद्यांचाही खात्मा करण्यात आला.
काश्मीरात दहशतवाद्यांसोबत चकमकीत कर्नल, मेजरसहर पाच जण हुतात्मा - Jammu and Kashmir
काश्मीरात दहशतवाद्यांसोबत चकमकीत कर्नल, मेजरसहर पाच जण हुतात्मा झाले आहेत. उत्तर काश्मीरमधील हंदवारा येथे ही घटना घडली.
![काश्मीरात दहशतवाद्यांसोबत चकमकीत कर्नल, मेजरसहर पाच जण हुतात्मा encounter](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-7037970-441-7037970-1588477258129.jpg)
कर्नल आशुतोष शर्मा, मेजर अनुज, जम्मू काश्मीर पोलीस दलातील शकील काझी आणि दोन जवान चकमकीत शहीद झाले. १६ तास ही चकमक सुरू होती, अशी माहिती काश्मीरमधील लष्कराचे प्रवक्ते राजेश कालिया यांनी दिली. २१ राष्ट्रीय रायफलचे जवान आणि काश्मीर पोलीसांनी ही कारवाई केली.
दहशतवाद्यांनी स्थानिक नागरिकांना ओलिस ठेवल्याची माहिती सुरक्षा दलांना गुप्त सुत्रांकडून मिळाली होती. नागरिकांची सुटका करण्यासाठी लष्कर आणि काश्मीर पोलिसांचे संयुक्त पथक गेले होते. त्यावेळी सुरक्षा दल आणि दहशदवाद्यांमध्ये जोरदार चकमक झाली. शहीद जवानांमध्ये दोन लष्कराचे अधिकारी, दोन जवान आणि जम्मू काश्मीर दलातील पोलीस उपनिरिक्षक शहीद झाले.