महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

१५०वी गांधी जयंती विशेष : ब्रिटिशांचा ठेवा, गैलोगी जलविद्युत प्रकल्प - गैलोगी जलविद्युत प्रकल्प

उत्तराखंडमधील डेहराडूनपासून २२ किलोमीटर दूर मसूरीमध्ये असणारा हा प्रकल्प, भारतातील पहिला जलविद्युत प्रकल्प आहे. ब्रिटिशकाळात, १९०७ साली सुरू झालेला हा प्रकल्प आजही देहराडून, बर्लोगंज, मसूरी आणि अनरवाला या चार शहरांना वीज पुरवतो आहे, हे विशेष!

१५०वी गांधी जयंती विशेष : ब्रिटिशांचा ठेवा, गैलोगी जलविद्युत प्रकल्प

By

Published : Aug 20, 2019, 6:15 AM IST

डेहराडून - या आधुनिक युगात, ना गांधींचे तत्वज्ञान बदलले आहे, ना त्यांचा प्रसिद्ध 'चरखा'. मात्र, जर काही बदलले असेल, तर ते आहेत विकासाचे परिमाण.
जेव्हा ब्रिटिशांनी भारतामध्ये वसाहतीकरण करण्यास सुरूवात केली, तेव्हा त्यांनी अनेक विकासात्मक प्रकल्प राबवण्यास सुरू केले. त्यांनी उभारलेल्या कित्येक प्रकल्पांपैकी काही प्रकल्प आजही त्यांच्या कार्याचा दाखला देत उभे आहेत. हे प्रकल्प कसे उभारले गेले, याच्या कथा खूपच रंजक आहेत. या कथा, ज्या माहिती देण्यासोबतच ऐकणाऱ्याला अचंबित करुन सोडतात.

यापैकीच एक प्रकल्प म्हणजे, गैलोगी जलविद्युत प्रकल्प. उत्तराखंडमधील देहराडूनपासून २२ किलोमीटर दूर मसूरीमध्ये असणारा हा प्रकल्प, भारतातील पहिला जलविद्युत प्रकल्प आहे. ब्रिटिशकाळात, १९०७ साली सुरू झालेला हा प्रकल्प आजही देहराडून, बर्लोगंज, मसूरी आणि अनरवाला या चार शहरांना वीज पुरवतो आहे, हे विशेष!

ब्रिटिशांनी जलविद्युत केंद्र सुरु करण्याच्या दृष्टीने मसूरी शहराची आधीच निवड केली होती. त्यानुसार त्यांनी १८९० पासूनच गैलोगी येथे या जलविद्युत केंद्राची निर्मिती करण्याच्या दृष्टीने तयारी चालू केली होती. या ऐतिहासिक निर्णयामुळे ब्रिटिश राजवटीच्या बंधनात असल्यापासूनच भारतातील औद्योगिक विकासाला चालना मिळाली होती.

सुरुवातीची सत्तर वर्षे हा प्रकल्प 'मसूरी सिटी बोर्ड' मार्फत चालवला जात होता. १९७६ नंतर त्याचा कार्यभार उत्तर प्रदेश वीज विभागाकडे देण्यात आला.

आज भारतात 'खेड्याकडे चला' असा संदेश देणाऱ्या महात्मा गांधींची १५०वी जयंती आपण मोठ्या उत्साहाने साजरी करत आहोत. मात्र, आजही देशात असे अनेक भाग आहेत जिथल्या लोकांपर्यंत विकास पोहोचलाच नाही.

ABOUT THE AUTHOR

...view details