बिहार: पाटनामध्ये महाविद्यालयीन विद्यार्थीनीवर सामूहिक बलात्कार - gang rape
बिहारमध्ये पुन्हा एका बलात्काराची घटना समोर आली आहे. पाटनामध्ये बीबीएचे शिक्षण घेणाऱ्या एका महाविद्यालयीन विद्यार्थींनीवर सामूहिक बलात्कार झाला आहे.
प्रतिकात्मक फोटो
पाटना- बिहारमध्ये पुन्हा एका बलात्काराची घटना समोर आली आहे. पाटनामध्ये बीबीएचे शिक्षण घेणाऱ्या महाविद्यालयीन विद्यार्थींनीवर सामूहिक बलात्कार झाला आहे. शहरातील जीवी मॉलच्या पार्किंगमधून तिला बळजबरीने एका रिकाम्या इमारतीत नेण्यात आले होते. तेथे तिच्यावर सामूहिक बलात्कार करण्यात आला. ही घटना सोमवारी संध्याकाळी ७ वाजता घडली.
या प्रकरणी आरोपींना अजून अटक करण्यात आली नाही. पोलीस तपास सुरू आहे. पाटलीपूत्र पोलीस ठाणे क्षेत्रामध्ये ही घटना घडली.