शिमला - हवामान विभागाने हिमाचल प्रदेशात येत्या 24 तासांत पाऊस आणि बर्फवृष्टीचा अंदाज वर्तविला आहे. याच वेळी शनिवारी थंडीने आपली येथील पकड आणखी घट्ट केली आहे.
'15 ते 16 नोव्हेंबरदरम्यान राज्यात बर्याच ठिकाणी पाऊस आणि बर्फवृष्टी होण्याची शक्यता आहे,' असे हवामान कार्यालयाच्या अधिकाऱ्याने सांगितले आहे.
'कॅस्पियन समुद्रापासून येणारी आणि अफगाणिस्तान-पाकिस्तान प्रदेश ओलांडून येणारी वादळे शनिवारी रात्रीपर्यंत येथे पोहोचण्याची शक्यता आहे. यामुळे लाहौल आणि स्पीती, चंबा, कुल्लू, किन्नौर, सिरमौर आणि शिमला जिल्ह्यांच्या उंचावरील भागात 17 नोव्हेंबरपर्यंत हलकी ते मध्यम बर्फवृष्टी होऊ शकेल,' असे या अधिकाऱ्याने सांगितले.
हेही वाचा -मनाली, रोहतांगचे सुंदर दृश्य; कोरोना-लॉकडाऊनमुळे प्रदूषणाची पातळी घटली