महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

योगी आदित्यनाथ यांची आरएसएस पदाधिकाऱ्यांबरोबर गोपनीय बैठक; 'या' विषयावर झाली चर्चा - योगी आदित्यनाथ

योगी आदित्य नाथ यांची भैयाजी जोशी यांच्यासमेवत शिवपूर भागातील कोईराजपूरच्या संत अतुलानंद स्कूलमध्ये बैठक झाली. यावेळी संघाचे पदाधिकारीही उपस्थित होते. या बैठकीत राममंदिराच्या कामाबाबत एक तास चर्चा करण्यात आल्याचे सूत्राने सांगितले. ब

cm yogi
योगी आदित्यनाथ

By

Published : Nov 27, 2019, 3:58 AM IST

वाराणसी - उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे वाराणशीच्या दोन दिवसीय दौऱ्यावर मंगळवारी पोहोचले. यावेळी त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह भैयाशी जोशी यांच्याबरोबर अत्यंत गोपनीय बैठक घेतली. बैठकीदरम्यान बनासर हिंदू विद्यापीठातील मुस्लिम प्राध्यापकाची नियुक्तींसह राम मंदिराबाबत चर्चा झाल्याचे सूत्राने सांगितले.


योगी आदित्य नाथ यांची भैयाजी जोशी यांच्यासमेवत शिवपूर भागातील कोईराजपूरच्या संत अतुलानंद स्कूलमध्ये बैठक झाली. यावेळी संघाचे पदाधिकारीही उपस्थित होते. या बैठकीत राममंदिराच्या कामाबाबत एक तास चर्चा करण्यात आल्याचे सूत्राने सांगितले.

योगी आदित्यनाथ यांची आरएसएस पदाधिकाऱ्यांबरोबर गोपनीय बैठक

मुस्लिम प्राध्यापक फिरोज खान यांच्या बनारस हिंदू विद्यापीठातील संस्कृत विभागातील नियुक्तीवरही बैठकीत चर्चा करण्यात आली. मात्र, याबाबत भाजपच्या तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कोणत्या पदाधिकाऱ्याने बोलण्यास नकार दिला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details