लखनौ - आग्र्यामध्ये बांधण्यात येत असलेल्या एका मुघल संग्रहालयाचे नाव बदलून त्याला 'छत्रपती शिवाजी महाराज' असे नाव देण्यात येणार असल्याची घोषणा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केली. ही तमाम शिवप्रेमींसाठी आनंदाची बातमी आहे.
मुघल आपले नायक कसे काय असू शकतात? शिवाजींच्या नावामुळे आम्हाला राष्ट्रवाद आणि स्वाभिमान या भावनेने अभिमान वाटेल. गुलामीची मानसिकता असलेल्या प्रतिक चिन्हांना नव्या उत्तर प्रदेशात काहीही स्थान असणार नाही. आपल्या सगळ्यांचे नायक छत्रपती शिवाजी महाराज आहेत. आता आग्रा येथे बांधण्यात येणारे संग्रहालय छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने ओळखले जाईल, असे योगी आदित्यनाथ यांनी स्पष्ट केले आहे. त्यांनी याबाबत ट्विट करूनही माहिती दिली आहे.