महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Apr 28, 2020, 2:51 PM IST

ETV Bharat / bharat

साधुंच्या हत्येप्रकरणी दोषींवर कडक कारवाई करण्याचे मुख्यमंत्री योगींचे आदेश

साधूंच्या हत्येच्या घटनेची दखल मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी घेतली आहे. त्यांनी जिल्हाधिकारी, वरिष्ठ पोलीस अधीक्षक आणि अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांना तातडीने घटनास्थळी पोहचून घटनेची सविस्तर माहिती द्यावी व दोषींवर कठोर कारवाई करावी अशी सूचना केली आहे.

मुख्यमंत्री योगींचे आदेश
मुख्यमंत्री योगींचे आदेश

लखनौ- बुलंदशहरमध्ये दोन साधूंच्या हत्येच्या घटनेची दखल मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी घेतली आहे. त्यांनी जिल्हाधिकारी, वरिष्ठ पोलीस अधीक्षक आणि अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांना तातडीने घटनास्थळी पोहोचून घटनेची सविस्तर माहिती द्यावी व दोषींवर कठोर कारवाई करावी अशी सूचना केली आहे.

दरम्यान, जिल्ह्यातील अनुपशहर कोतवाली क्षेत्राच्या अंतर्गत येणाऱ्या शिव मंदिराच्या परिसरात झोपलेल्या दोन साधूंची धारदार हत्याराने निर्घृण हत्या करण्यात आली. पोलिसांच्या माहितीनुसार, आपला चिमटा चोरल्याने या साधूंनी एका युवकाला झापले होते, या नशेबाज युवकाने साधूंचा गळा चिरून त्यांची हत्या केल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे या युवकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

हे दोन साधू या मंदिरात बऱ्याच काळापासून राहात होते. पोलिसांच्या माहितीनुसार, या शिवमंदिरातील साधूंचा चिमटा काही दिवसापूर्वी या नशेबाज युवकाने चोरला होता. याची माहिती मिळाल्यानंतर दोन्ही साधूंनी या युवकाला जाब विचारला होता. तसेच, पुन्हा असे न करण्याबाबत बजावले होते. याच रागातून या युवकाने साधूची हत्या केली असल्याचा संशय येथील ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details