लखनऊ -हाथरस सामूहिक बलात्कार आणि हत्याप्रकरणाची केंद्रीय गुन्हे अन्वेषण(सीबीआय) विभागाद्वारे चौकशी व्हावी अशी मागणी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केली आहे. राज्यामध्ये महिलांवरील अत्याचाराच्या घटना वाढल्याचे म्हणत विरोधी पक्षांनी योगी आदित्यनाथ सरकारला धारेवर धरले आहे. संपूर्ण उत्तर प्रदेश राज्य आणि भारतात महिला अत्याचारांविरोधात आंदोलन होत आहेत.
हाथरस प्रकरणाची सीबीआय चौकशी व्हावी, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची मागणी - हाथरस प्रकरणी
हाथरस सामूहिक बलात्कार आणि हत्येप्रकरणाची केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाद्वारे चौकशी व्हावी अशी मागणी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केली आहे.
आज काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनी हाथरस पीडित कुटुंबींची भेट घेतली. यावेळी दोन्ही काँग्रेस नेत्यांनी योगी सरकारवर टीका केली. पीडित कुटुंबीयांना मदत करण्याचे सोडून योगी सरकार असे का वागत आहे? हे समजत नसल्याचे प्रियंका गांधी म्हणाल्या. जोपर्यंत तरुणीला न्याय मिळत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरू ठेवू, असे राहुल गांधी म्हणाले. पीडित कुटुंबीयांशी चर्चा केल्यानंतर माध्यम प्रतिनिधींनी राहुल गांधी आणि प्रियंका गांधींना गराडा घातला होता. यावेळी हाथरस गावात पोलिसांचा कडोकोड बंदोबस्त ठेवण्यात आला होता. जिल्हाधीकाऱ्यांच्या निलंबणाची मागणी कुटुंबीयांनी केली आहे.