भोपाळ - काँग्रेस आज आपला 136 वा स्थापना दिवस साजरा करीत आहे. तर काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि खासदार राहुल गांधी भारतात नसून परदेश दौऱ्यावर गेले आहेत. रविवारी काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी ही माहिती दिली आहे. राहुल ईटलीला गेले असल्याची चर्चा जोरात सुरू आहे. राहुल यांच्या आजी (सोनिया गांधी यांच्या आई) मिलानमध्ये राहतात. यावरून मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह यांनी राहुल गांधींवर निशाणा साधला आहे.
मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह यांचे टि्वट 'काँग्रेस आपला 136 वा स्थापना दिवस साजरा करत आहे आणि राहुल जी 'नौ दो ग्यारह' झाले आहेत, असे टि्वट शिवराज यांनी केलं. राहुलच्या परदेश दौर्यावर यापूर्वीही अनेकदा प्रश्न उपस्थित झाले आहेत. फेब्रुवारी 2020 मध्ये राहुल गांधी परदेश दौर्यावर होते. त्यानंतर भाजपने राहुल गांधींवर जोरदार हल्लाबोल केला होता. ईटलीमध्ये कोरोनाचा सर्वांत जास्त प्रसार झाला होता. त्याच काळात राहुल गांधी ईटलीला गेले होते.
महाराष्ट्र, हरयाणा निवडणुकीपूर्वी राहुल गांधींचा परदेश दौरा -
गेल्या वर्षी म्हणजेच महाराष्ट्र आणि हरयाणामध्ये विधानसभेच्या निवडणुका घेण्यात आल्या होत्या. तेव्हा, मतदानाच्या काही काळ आधी राहुल गांधी परराष्ट्र दौऱ्यावर गेले होते. राहुल गांधी 2018 मध्ये इटलीला आपल्या आजीला भेटण्यासाठी गेले होते. याची माहिती त्यांनी टि्वट करून दिली होती. त्यानंतरही भाजपने राहुल यांच्यावर जोरदार निशाणा साधला.
म्हणून राहुल गांधी इटली दौऱ्यावर -
देशात शेतकरी आंदोलन सुरू असताना आणि आज काँग्रेसचा स्थापना दिवस असताना, राहुल गांधी ईटलीला गेल्याने त्यांच्यावर टीका करण्यात आली आहे. यावर काँग्रेसकडून भाजपाच्या टीकेला प्रत्युत्तर दिलं आहे. . काँग्रेस नेते राजीव सातव यांनी राहुल गांधीच्या इटली दौऱ्यामागचं कारण सांगितलं. राहुल गांधी यांच्या आजींची प्रकृती फार खराब आहे. त्यांना भेटण्यासाठी ते गेले आहेत, असे त्यांनी सांगितले.
हेही वाचा -अटल बोगद्यातील वाहतुकीस अडथळा; १५ पर्यटक कुल्लू पोलिसांच्या ताब्यात, ४० हजाराचा दंड