महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

#CAA : 'नरेंद्र मोदी 'राम' तर अमित शाह 'हनुमान'

मोदी हे श्री राम तर अमित शाह हनुमान आहेत, असं वक्तव्य भाजपचे नेते आणि मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी केले आहे.

शिवराज सिंह चौहान
शिवराज सिंह चौहान

By

Published : Jan 29, 2020, 5:28 PM IST

नवी दिल्ली - केंद्र सरकारला नागरिकत्व सुधारणा कायदा लागू होण्यापासून कोणीच थांबवू शकत नाही. मोदी हे श्री राम तर अमित शाह हनुमान आहेत, असं वक्तव्य भाजपचे नेते आणि मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी केले आहे.

'देशामध्ये नागरिकत्व सुधारणा कायदा लागू करण्यापासून जगातील कोणतीच शक्ती थांबवू शकत नाही. नरेंद्र मोदी हे कोणालाच घाबरत नसून ते एक सिंह आहेत. नरेंद्र मोदी हे राम तर अमित शहा हे हनुमान आहेत', असे शिवराज सिंह चौहान म्हणाले. यापुर्वी पाकिस्तानमध्ये धर्माच्या आधारावर ज्यांचा छळ होत आला आहे, अशा स्थलांतरीत लोकांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देवाप्रमाणेच आहेत, असे वक्तव्य शिवराज सिंह चौहान यांनी केले होते. भाजपचे जम्मू-काश्मीरचे प्रदेशाध्यक्ष रवींदर रैना यांनी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना राम तर आणि अमित शाह यांना हनुमान असे म्हटले होते.

ABOUT THE AUTHOR

...view details