बंगळुरु - कर्नाटकात काँग्रेसच्या २ आमदारांनी एका पाठोपाठ एक राजीनामे सादर केले आहेत. यामुळे आघाडी सरकारला सुरुंग लावणारे राजकीय नाट्य सुरू झाले आहे. या घडामोडींमुळे मुख्यमंत्री कुमारस्वामी यांचे सरकार धोक्यात येण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. तर काँग्रेसचे नेते सिद्धरामय्या यांनी बंगळुरातील आपल्या निवासस्थानी काँग्रेस आमदारांची बैठक बोलावली आहे.
कुमारस्वामी सरकारला धोक्याची घंटा; काँग्रेसच्या दोन आमदारांचे राजीनामे - jds
राज्यात सर्व राजकीय उलथापालथ सुरू असताना मुख्यमंत्री कुमारस्वामी परदेश दौऱ्यावर आहेत. त्यांनी या घडामोडींवर ट्विटद्वारे प्रतिक्रिया दिली आहे. कर्नाटक सरकार अस्थिर करण्यामागे भाजपचाच डाव असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
कर्नाटकातील बल्लारी जिल्ह्यातील विजयनगरचे काँग्रेसचे आमदार आनंद सिंह आणि गोकाकचे आमदार रमेश जार्किहोली यांनी आपापल्या पदांचे राजीनामे दिले. राज्यात सर्व राजकीय उलथापालथ सुरू असताना मुख्यमंत्री कुमारस्वामी परदेश दौऱ्यावर आहेत. त्यांनी या घडामोडींवर ट्विटद्वारे प्रतिक्रिया दिली आहे. कर्नाटक सरकार अस्थिर करण्यामागे भाजपचाच डाव असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. कुमारस्वामी यांनी याआधीही अनेकदा हा आरोप केला आहे. मात्र, या राजकीय उलथापालथी थांबवण्यात त्यांना यश आलेले नाही.
कर्नाटकातील बल्लारी जिल्ह्यातील विजयनगरचे काँग्रेसचे आमदार आनंद सिंह यांनी आपल्या सदस्यत्वाचा राजीनामा सोपवला. त्यानंतर काँग्रेसचे गोकाक येथील आमदार रमेश जार्किहोली यांनीही राजीनामा सादर केला आहे. त्यामुळे काँग्रेसमध्ये आमदारांच्या गळतीला सुरुवात झाल्याचे दिसत आहे. हे दोन्ही आमदार भाजपच्या वाटेवर असल्याची माहिती समोर येत आहे.
काँग्रेसचे आमदार रमेश जार्किहोलींवर कोट्यवधी रुपयांच्या कर्जाचा डोंगर असल्याने त्यांना राज्यातील अनेक बँकांनी दहा दिवसांच्या आत कर्ज फेडण्यासाठी नोटीस बजावली आहे. शिवाय कर्जाची रक्कम दिलेल्या मुदतीत न जमा केल्यास त्यांची संपत्ती देखील जप्त करण्याची कारवाई केली जाईल, असा इशाराही बँकांनी दिला आहे.