विशाखापट्टणम - आंध्रप्रदेशातील विशाखापट्टणममध्ये फार्मा कंपनीत विषारी वायू गळती झाल्याची घटना घडली. यामध्ये एका लहान मुलासह 11 जणांचा मृत्यू झाला आहे. तर अनेक जणांवर रूग्णालयात उपचार सुरु आहे. या घटनेवर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दु:ख व्यक्त केले आहे. तसेच यामध्ये ज्यांचा मृत्यू झाला त्यांच्या कुटुंबीयांच्या दु:खात मी सहभागी असल्याचे केजरीवाल म्हणाले.
विशाखापट्टणम दुर्घटना: मृतांच्या कुटुंबीयांच्या दु:खात मी सहभागी - केजरीवाल
आंध्रप्रदेशातील विशाखापट्टणममध्ये फार्मा कंपनीत विषारी वायू गळती झाल्याची घटना घडली. यामध्ये एका लहान मुलासह 11 जणांचा मृत्यू झाला आहे. तर अनेक जणांवर रूग्णालयात उपचार सुरु आहे. या घटनेवर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दु:ख व्यक्त केले आहे.
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल
या घटनेनंतर स्थानिक प्रशासनाने परिसरातील पाच गावं रिकामी केली आहेत. या दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी एक कोटींची मदत मिळणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांनी केली. या घटनेनंतर राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने आंध्रप्रदेश सरकारला नोटीस जारी केली आहे.