बिलासपुर -हिमाचल प्रदेशातील बिलासपूर येथील स्थानिक रुग्णालयात एका संभाव्य कोरोनाबाधित रुग्णाला घेऊन रुग्णवाहिका पोहोचली होती. रुग्णालयात त्या रुग्णाकडे तासभर लक्ष देण्यात आले नाही. ई टीव्ही भारतचे प्रतिनिधी शुभम राही याने मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांना फोन लावल्यानंतर त्या रुग्णावर उपचार सुरू झाले.
'ईटीव्ही भारत' प्रतिनिधीच्या फोनची मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल, संभाव्य कोरोना रुग्णावर उपचार सुरू
रुग्णालयाकडून रुग्णावर उपचार होत नसल्याने ईटिव्ही भारतचे प्रतिनिधी शुभम राही याने आरोग्य विभागात फोन करुन घडलेल्या प्रकरणाची माहिती दिली. आरोग्य विभागानेही संबंधित प्रकरणाची दखल घेतली नाही. यांनतर ईटिव्ही भारतच्या प्रतिनिधीने हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री जयराम ठाकुर यांना फोन लावला.

मुख्यमंत्र्यांनी फोनची दखल घेत रुग्णावर उपचार करण्याचे आदेश रुग्णालयाला दिले. यांनंतर त्या रुग्णावर उपचार सुरु झाले. राज्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 27 इतकी आहे.