महाराष्ट्र

maharashtra

जागतिक आदिवासी दिनानिमित्त सोरेन दिसले पारंपारिक वेशभूषेत; ढोल वाजवत दिल्या शुभेच्छा

By

Published : Aug 9, 2020, 6:36 PM IST

जागतिक आदिवासी दिनाच्या निमित्ताने हरियाणाचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी वृक्षारोपण केले. मोरहाबादीमध्ये असणाऱ्या नीलांबर-पीतांबर पार्कमध्ये हा कार्यक्रम पार पडला. विशेष म्हणजे यावेळी मुख्यमंत्र्यांनी आपला पारंपारिक आदिवासी पेहराव परिधान केला होता. तसेच त्यांनी ढोल वाजवत आदिवासी दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

CM Hemant Soren did plantation on World Tribal Day
जागतिक आदिवासी दिनानिमित्त सोरेन दिसले पारंपारिक वेशभूषेत; ढोल वाजवत दिल्या शुभेच्छा

रांची : जागतिक आदिवासी दिनाच्या निमित्ताने हरियाणाचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी वृक्षारोपण केले. मोरहाबादीमध्ये असणाऱ्या नीलांबर-पीतांबर पार्कमध्ये हा कार्यक्रम पार पडला. विशेष म्हणजे, यावेळी मुख्यमंत्र्यांनी आपला पारंपारिक आदिवासी पेहराव परिधान केला होता. तसेच, त्यांनी ढोल वाजवत आदिवासी दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

जागतिक आदिवासी दिनानिमित्त हेमंत सोरेन यांनी केले वृक्षारोपण..

आदिवासी दिनानिमित्त आता मिळणार सुट्टी -

याप्रसंगी बोलताना हेमंत सोरेन यांनी जाहीर केले, की यापुढे दरवर्षी जागतिक आदिवासी दिनानिमित्त राज्यात सरकारी सुट्टी राहील. तसेच, वृक्षारोपण करत त्यांनी असा विश्वास व्यक्त केला, की वृक्षांची आपल्यावर वर्षानुवर्षे जशी कृपा राहिली आहे ती यापुढेही अबाधित राहील.

भविष्यात मोठ्या स्तरावर होणार कार्यक्रम -

आदिवासी हे निसर्गाच्या सर्वात जवळ राहतात. त्यांनी निसर्गाचे केलेले संवर्धन आणि संरक्षण हे खरोखरच कौतुकास्पद आहे. त्यामुळे त्यांच्यासाठी असलेल्या या दिवसाचा कार्यक्रम भव्य प्रमाणात व्हायला हवा. कोरोना महामारीमुळे यावर्षी ते शक्य नसले, तरी भविष्यात आपण ते नक्कीच करू, असे सोरेन यावेळी म्हणाले.

राज्यासाठी योग्य तो निर्णय घेतला जाईल -

कोरोनाबाबत बोलताना सोरेन म्हणाले, की देशभरात अनलॉकची प्रक्रिया सुरू झाली असली, तरी झारखंड यात बराच मागे आहे. हे लोकांच्या आरोग्यासाठी आणि त्यांच्या हितासाठीच असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच, राज्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेत टप्प्याटप्प्याने योग्य तो निर्णय घेण्यात येईल, असेही ते म्हणाले.

ABOUT THE AUTHOR

...view details