महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

कर'नाटक' : येडीयुरप्पा सरकारने विश्वासदर्शक प्रस्ताव जिंकला

मुख्यमंत्री येडीयुरप्पा यांनी आज विश्वासदर्शक ठराव सभागृहात मांडला. हा ठराव आवाजी मतदानाने मंजूर करण्यात आला.

बंगळुरू

By

Published : Jul 29, 2019, 7:32 AM IST

Updated : Jul 29, 2019, 12:22 PM IST

बंगळुरू - कर्नाटकमधील भाजप सरकारने विश्वासदर्शक प्रस्ताव आवाजी मतदानाने जिंकला. मुख्यमंत्री येडीयुरप्पा यांनी आज विश्वासदर्शक प्रस्ताव सभागृहात मांडला. हा प्रस्ताव आवाजी मतदानाने मंजूर करण्यात आला. ठरावावर मतदान घेण्यापूर्वी शेतकऱ्यांना २ हजार रुपये पीएम किसान योजनेंतर्गत मदत देण्याची घोषणा येडीयुरप्पा यांनी केली. ही मदत दोन टप्प्यात देणार असल्याचे त्यांनी सांगितले.

विरोधी नेते सिद्धरामय्या, कुमारस्वामी यांनी भाजप सरकारवर टीका केली. तुम्ही मुख्यमंत्री व्हाल मात्र, तुम्ही बंडखोर आहात, तुमच्याकडून स्थिर सरकारची आम्ही अपेक्षा ठेऊ शकत नाही. आम्ही विश्वासदर्शक ठरावाच्या विरोधात आहोत कारण, हे सरकार असंवैधानिक आणि अनैतिक आहे, असे सिद्धरामय्या म्हणाले.

सत्ताही कुणाकडेच कायम राहत नाही, ना नरेंद्र मोदी कायम राहतील, ना जे.पी नड्डा राहणार आहेत. आम्ही तुमचे संख्याबळ १०५ वरून १०० आणि त्याहून कमी करण्यासाठी प्रयत्न करणार नाही. तुम्ही ज्या शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर बोलत आहात त्यावर आम्ही अगोदरच काम करणे चालू केले होते, ते तुम्ही निदान पाहिले देखील नसाल. राज्यातील जनतेच्या हितासाठी आम्ही आपल्याला सहकार्यच करू, असे कुमारस्वामी म्हणाले.

Live update -

  • सकाळी 11.45 -येडीयुरप्पा सरकारने आवाजी मतदानाने विश्वासदर्शक ठराव जिंकला.
  • सकाळी 11.30 -तुम्ही मुख्यमंत्री व्हाल मात्र, तुम्ही बंडखोर आहात, तुमच्याकडून स्थिर सरकारची आम्ही अपेक्षा ठेऊन शकत नाही. आम्ही विश्वासदर्शक ठरावाच्या विरोधात आहोत कारण, हे सरकार असंवैधानिक आणि अनैतिक आहे - सिद्धरामय्यांकडून मुख्यमंत्री येडीयुरप्पांना प्रत्युत्तर
  • सकाळी 11.20 -शेतकऱ्यांचे प्रश्न आणि दुष्काळावर आमचे लक्ष आहे. राज्यातील शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेंतर्गत २ टप्प्यात २ हजार रुपये देणार आहे. यासाठी विरोधकांनीही सहकार्य करावे - येडीयुरप्पा
  • सकाळी 11.13 -आत्तापर्यंत जे झाले गेले ते विसरून आपल्याला काम करायचे आहे. मी सभागृहाला आश्वासन देतो की, मी द्वेषाचे राजकारण करणार नाही. मला विरोध करणाऱ्यांवरही मी प्रेम करतो. मी पंतप्रधान नरेंद्र मोदी, पक्षाध्यक्ष अमित शाह आणि जे.पी. नड्डा यांचा आभारी आहे - येडीयुरप्पा
  • सकाळी 11.01 - विधानसभेच्या कामकाजाला सुरुवात.. अध्यक्ष रमेशकुमार, मुख्यमंत्री येडीयुरप्पा उपस्थित
  • सकाळी 10.45- तीन अपात्र आमदार सभागृह अध्यक्ष रमेशकुमार यांच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात.. रमेश जारकीहोळी, महेश कुमाथली, आर. शंकर यांची न्यायालयात धाव.
  • सकाळी 10.36 - काँग्रेस नेत्यांची बैठक संपली.
  • सकाळी 10.01 - कर्नाटक विधानसभेत काँग्रेस नेत्यांची बैठक सुरू.. सिद्धरामया, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष दिनेश गुंडू राव, के जे जॉर्ज, प्रियांक खर्गे, एम.बी पाटील, ईश्वर खांद्रे आणि इतर आमदार उपस्थित
  • सकाळी 9.55 - मुख्यमंत्री येडीयुरप्पा सभागृहात दाखल होण्यासाठी निघाले, भाजप सरकार १२ वाजता मांडणार आहे विश्वासदर्शक ठराव.

कर्नाटकमध्ये सुरू असलेल्या राजकीय घडामोडींना अद्याप पूर्णविराम मिळालेला नाही. बहुमताअभावी कुमारस्वामींचे काँग्रेस-धर्मनिरपेक्ष जनता दलाचे (जेडीएस) सरकार कोसळल्यानंतर सत्ता स्थापन करणाऱ्या भाजपपुढे सरकार स्थिर ठेवण्याचे आव्हान आहे. आज येडीयुरप्पा सरकारला विश्वासदर्शक ठरावाला सामोरे जावे लागणार आहे. त्यातच काल (रविवार) विधानसभा अध्यक्ष के. आर. रमेशकुमार यांनी आणखी १४ बंडखोर आमदारांना २०२३ पर्यंत अपात्र घोषित केले आहे. त्यामुळे भाजपलाही त्याचा फटका बसण्याची शक्यता आहे.

मुख्यमंत्री येडीयुरप्पा यांनी आज विश्वासदर्शक ठराव सभागृहात मांडणार असल्याचे सांगितले. विश्वादर्शक ठराव आम्ही नक्की जिंकू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. आज १२ वाजता सभागृहात हा ठराव मांडला जाणार आहे. कर्नाटक विधानसभा अध्यक्षांनी काँग्रेस- जेडीएसच्या १४ बंडखोर आमदांराना अपात्र ठरवले आहे. आतापर्यंत एकूण १७ आमदारांना अपात्र ठरवण्यात आले आहे. १५ व्या विधानसभेचे विसर्जन होईपर्यंत अपात्र आमदारांना निवडणूक लढवता येणार नाही, असे अध्यक्षांनी स्पष्ट केले आहे.

विधानसभा अध्यक्ष रमेशकुमार यांनी आमदारांवर केलेल्या अपात्रतेच्या कारवाईवर भाजपने टीका केली आहे. ही कारवाई अन्यायकारक असून, त्याने कायद्याचे उल्लंघन झाले आहे. सर्वोच्च न्यायालयात त्याविरोधात दाद मागितली जाईल, असे पक्षाने स्पष्ट केले. आमदारांनी स्वत:हून राजीनामे दिले होते; ते स्वीकारायला हवे होते, असे भाजपचे आमदार गोविंद कारजोल यांनी सांगितले.

हा लोकशाहीचा विजय असून या आमदारांनी भाजपशी हातमिळवणी करून पक्षाशी द्रोह केला. लोकांच्या न्यायालयातही या आमदारांना शिक्षा मिळेल, असे काँग्रेसने म्हणत विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयाचे स्वागत केले आहे.

आज काय होणार?

काँग्रेस, जेडीएसच्या १७ आमदारांना अपात्र घोषित करण्यात आल्याने विधानसभेची सदस्यसंख्या २०७ वर आली आहे. त्यामुळे बहुमतासाठी भाजपला १०४ मते हवी आहेत. भाजपकडे एका अपक्ष आमदारासह १०६ इतके संख्याबळ आहे. काँग्रेसकडे ६६ तर जेडीएसकडे ३४ आमदार आहेत. त्यामुळे भाजपला विश्वासदर्शक ठराव जिंकता येवू शकतो. भाजपचे बहुमत काठावर असून अपात्र आमदारांच्या मतदारसंघात पोटनिवडणुका जाहीर झाल्यास तेथे यश मिळविणे महत्त्वाचे ठरेल. यामुळे या सरकारवरही टांगती तलवार कायम राहण्याची शक्यता आहे.

Last Updated : Jul 29, 2019, 12:22 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details