नवी दिल्ली- कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर दिल्ली सरकारने अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. लॉकडाऊनच्या दुसऱ्या दिवशी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी बैठक घेऊन निर्णय जारी केले आहेत. जीवनावश्यक आणि दैनंदिन वस्तूंची दुकाने २४ तास खुली राहणार असल्याचे केजरीवाल यांनी सांगितले. तसेच विविध कंपन्या आणि कारखानेही सुरूच राहतील, असेही केजरीवाल यांनी स्पष्ट केले.
घरपोच अन्न देणाऱ्या ऑनलाईन सुविधा सुरू राहणार. डिलिव्हरी देणाऱ्या व्यक्तीने ओळखपत्र दाखवणे बंधनकारक असणार आहे, असेही केजरीवाल यांनी सांगितले.