पिथौरागढ़ (उत्तराखंड) -जिल्ह्यात मुसळधार पावसाने थैमान घातले आहे. बंगापानी तालुक्यातील गैला टांगा येथे रात्रीच्या वेळी ढगफुटी झाली. या दुर्घटनेत ३ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. तसेच 11 जण बेपत्ता झाले आहेत.
उत्तराखंडच्या पिथौरागडमध्ये ढगफुटी; तीन जणांचा मृत्यू, 11 जण बेपत्ता - पिथौरागढ़ ढगफुटी
पिथौरागढ़च्या बंगापानी तालुक्यातील गैला टांगा येथे रात्रीच्या वेळी ढगफुटी झाली. यात तीन जणांचा मृत्यू झाला आहे.
![उत्तराखंडच्या पिथौरागडमध्ये ढगफुटी; तीन जणांचा मृत्यू, 11 जण बेपत्ता cloudburst-in-pithoragarh-three-kills-and-11-missing](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-8094744-163-8094744-1595225111695.jpg)
उत्तराखंडच्या पिथौरागडमध्ये ढगफुटी
उत्तराखंडच्या पिथौरागडमध्ये ढगफुटी; तीन जणांचा मृत्यू तर 11 जण बेपत्ता
या :ढगफुटीनंतर याठिकाणी एसडीआरएफ, आपत्ती व्यवस्थापन पथक, उपविभागीय अधिकारी आणि आमदार घटनास्थळाकडे रवाना झाले आहेत. स्थानिक लोक बचाव कार्य करत आहे. याठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळे रस्ता वाहून गेला आहे. तर एक घरही उ्द्ध्वस्त झाले.
तसेच याठिकाणी झालेल्या मुसळधार पावसामुळे टनकपुर-तवाघाट महामार्ग बंद करण्यात आला आहे. डोंगराळ भाग असल्यामुळे मोबाईलला सिग्नलही मिळत नाही आहे. यामुळे माहिती मिळण्यास अडचण होत आहे आणि बचाव कार्यातही अडथळे निर्माण होत आहे.