चामोली -उत्तराखंडमध्ये पावसाचा कहर सुरूच असून सोमवारी चमोली जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे बऱ्याच ठिकाणी भूस्खलन झाल्याच्या घटना घडल्या आहेत. यात दोन लोकांचा मृत्यू झाला आहे. तसेच बरेच लोक बेपत्ता झाले आहेत. त्यांच्या शोध घेतला जात आहे.
उत्तराखंडच्या चमोली जिल्ह्यात ढगफुटी.. नदीकाठचे घर कोसळले; दोघांचा मृत्यू - uttarakhand chamoli
विकासखंड घाटातील लांखी या गावात नदीला पूर आल्याने यात नदीकाठचे घर नदीत कोसळले आहे. या घराच्या ढिगाऱ्याखाली एक महिला आणि एक मुलगी दबली गेली. बचाव पथकाला महिलेचा मृतदेह मिळाला असून मुलगी अद्याप बेपत्ता आहे.
उत्तराखंडच्या चमोली जिल्ह्यात ढगफुटी होऊन नदीकाठचे घर कोसळले
चमोली जिल्ह्यात सोमवारी सकाळी ढगफुटी होऊन घाट बाजार येथील चुफलागाड नदीला पूर आला. या पुरात चार दुकाने वाहून गेली आहेत. या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. तसेच विकासखंड घाटातील लांखी या गावात नदीला पूर आल्याने यात नदीकाठचे घर नदीत कोसळले आहे. या घराच्या ढिगाऱ्याखाली एक महिला आणि एक मुलगी दबली गेली. बचाव पथकाला महिलेचा मृतदेह मिळाला असून मुलगी अद्याप बेपत्ता आहे. याचबरोबर आणखी एका गावात घर कोसळून एका महिलेचा मृत्यू झाला आहे.
Last Updated : Aug 12, 2019, 2:14 PM IST