नवी दिल्ली : काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी गुरूवारी एका रस्ते अपघातातून बालंबाल बचावल्या. उत्तर प्रदेश दौऱ्यावर असताना प्रियंकांच्या वाहनांच्या ताफ्यात हा अपघात झाला. सुदैवाने या अपघातात कुणीही जखमी झाले नाही.
प्रियंका गांधींच्या वाहनाच्या ताफ्यातील कारचा अपघात - उत्तर प्रदेश
उत्तर प्रदेश दौऱ्यावर असताना प्रियंकांच्या वाहनांच्या ताफ्यात हा अपघात झाला. सुदैवाने या अपघातात कुणीही जखमी झाले नाही.

प्रियंका गांधी अपघातातून बालंबाल बचावल्या
प्रियंका गांधी अपघातातून बालंबाल बचावल्या
याविषयी सविस्तर वृत्त असे की, प्रियंका गांधी गुरूवारी उत्तर प्रदेशातील रामपूरकडे जात असताना त्यांच्या वाहनांच्या ताफ्यातील चार गाड्यांची धडक झाली. सुदैवाने यात कुणालाही काहीही इजा झाली नाही. प्रियंका गांधींनाही या दुर्घटनेत काहीही इजा झाली नाही. शेतकरी आंदोलनात कथितरित्या मृत्युमुखी पडलेल्या नव्रीत सिंह यांच्या कुटुंबियांचे सांत्वन करण्यासाठी प्रियंका गांधी रामपूरला चालल्या होत्या.
Last Updated : Feb 4, 2021, 11:25 AM IST