महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

प्रतिनोबेल म्हणून ओळखला जाणारा 'राईट लाईव्हलीहूड' पुरस्कार 16 वर्षीय ग्रेटा थनबर्गला जाहीर - पर्यावरण विषयक कार्यकर्ती ग्रेटा थनबर्ग

16 वर्षीय ग्रेटाला राजकीय स्तरावर हवामान बदलाविषयी तातडीने पावले उचलण्यासाठी प्रेरणा दिल्याबद्दल 'राईट लाईव्हलीहूड' या पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे. या पुरस्काराला 'प्रतिनोबेल' म्हणून ओळखले जाते. स्विडिश-जर्मन नागरीक असलेले परोपकारी जकोब वॉन यूक्सकुल यांनी नोबेल पुरस्कारांपासून दुर्लक्षित राहिलेल्या लोकांना सन्मानित करण्यासाठी या पुरस्काराची सुरुवात केली होती.

पर्यावरण विषयक कार्यकर्ती ग्रेटा थनबर्ग

By

Published : Sep 25, 2019, 5:31 PM IST

Updated : Sep 25, 2019, 6:09 PM IST

स्वीडन - पर्यावरण विषयक कार्यकर्ती ग्रेटा थनबर्ग गेल्या काही दिवसांपासून स्विडीश संसदेबाहेर करत असलेल्या आंदोलनासाठी चर्चेत आहे. तिने उभ्या केलेल्या आंदोलनानंतर नुकतेच संयुक्त राष्ट्र संघात तिचे विचार मांडण्यासाठी आमंत्रितही करण्यात आले होते. 16 वर्षीय ग्रेटाला राजकीय स्तरावर हवामान बदलाविषयी तातडीने पावले उचलण्यासाठी प्रेरणा दिल्याबद्दल 'राईट लाईव्हलीहूड' या पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे. या पुरस्काराला 'प्रतिनोबेल' म्हणून ओळखले जाते.

'राईट लाईव्हलीहूड' पुरस्कार 16 वर्षीय ग्रेटा थनबर्गला जाहीर

नोबेल शांतता पुरस्कारासाठीही ग्रेटाला नामांकन देण्यात आले आहे. पुरस्कारकर्त्यांनी ग्रेटाविषयी बोलताना म्हटले आहे की, बदल घडवून आणण्याची शक्ती प्रत्येकात आहे. ग्रेटा त्याचेच एक उदाहरण आहे. तिच्यामुळे राजकीय पातळीवर पर्यावरणविषयक प्रश्नांना उपस्थित करण्यास सर्व स्तरातील लोकांना बळ मिळेल.

हेही वाचा -कामाचे तास कमी करणे पर्यावरणासाठी फायद्याचे - संशोधक

1980 साली या पुरस्काराची सुरुवात झाली. स्विडिश-जर्मन नागरीक असलेले परोपकारी जकोब वॉन यूक्सकुल यांनी नोबेल पुरस्कारांपासून दुर्लक्षित राहिलेल्या लोकांना सन्मानित करण्यासाठी या पुरस्काराची सुरुवात केली होती. बक्षीस म्हणून दरवर्षी चार विजेत्यांना प्रत्येकी दहा लाख क्रोनर(जवळपास 73 लाख रूपये) दिले जातात. 4 डिसेंबरला म्हणजेच नोबेल पारितोषिक वितरणाच्या सहा दिवस आधी स्टॉकहोम येथे हा पुरस्कार वितरण समारंभ आयोजित करण्यात आला आहे.

Last Updated : Sep 25, 2019, 6:09 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details