नवी दिल्ली -लॉकडाऊन काळात विमानसेवा बंद पडल्यामुळे एअर इंडिया आर्थिक संकटात सापडली. त्यामुळे पायलटचे पगार वेळेवर करणे कंपनीला शक्य होत नव्हते. अनेक पायलटचे पगार प्रलंबित आहेत. ही प्रलंबित थकबाकी तातडीने फेडण्याची मागणी एअर इंडिया पायलट्स असोसिएशनने नागरी उड्डाण मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांना केली आहे. तसेच पायलट्सना तातडीने एअर इंडिया सोडण्याची परवानगी देण्याबाबतही विचारणा करण्यात आली आहे.
8 जुलैला भारतीय पायलट गिल्ड, एमसीएचे अधिकारी आणि एअर इंडियाचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक यांच्यासह एक बैठक झाली. ज्या बैठकीत एअर इंडिया पायलट असोसिएशनने त्यांची सर्व थकबाकी देण्याची मागणी केली आहे.