नवी दिल्ली - सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी पत्र लिहून आपले उत्तराधिकारी म्हणून न्यायमूर्ती एस. ए. बोबडे यांचे नाव सुचवले आहे. सेवाज्येष्ठतेनुसार, न्यायमूर्ती बोबडे सर्वोच्च न्यायालयाचे गोगोई यांच्यानंतरचे वरिष्ठ न्यायमूर्ती आहेत.
न्यायमूर्ती बोबडे होणार उत्तराधिकारी, सरन्यायाधीश गोगोईंकडून शिफारस - न्यायमूर्ती बोबडे होणार पुढील सरन्यायाधीश
सरन्यायाधीश सेवानिवृत्तीआधी पुढील सरन्यायाधीशाचे नाव सुचवतात, अशी परंपरा आतापर्यंत राहिली आहे. त्यानुसार, बोबडे यांच्या नावाची शिफारस करण्यात आली आहे. सरन्यायाधीश गोगोई १७ नोव्हेंबर २०१९ ला सेवानिवृत्त होत आहेत.
सरन्यायाधीश गोगोई